मुंबई : कौन बनेगा करोडपती हा टीव्ही शो सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांच्या कथा लोकांचे खूप मनोरंजन करतात. अलीकडेच, असा एक स्पर्धक शोमध्ये आला जो आपल्या पत्नी आणि आईमधील मतभेदांमुळे नाराज दिसला आणि शोमध्ये त्या व्यक्तीने ही गोष्ट उघड केली.
स्पर्धक इंद्रजितची अडचण
हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाने म्हटलं की, लग्नाआधी मुलगा आणि मुलीचे किती गुण जुळतात हे पाहिलं जातं. पण त्या ऐवजी मुलगी आणि मुलाच्या आईचे किती गुण जुळतात हे पाहिलं पाहिजे. यानंतर अमिताभ (Amitabh Bachchan) यांनी हसत विचारलं की, तू चेक आधी कोणाच्या हातामध्ये देशील? स्पर्धकाने उत्तर दिले की, जिंकलेल्या रक्कमेला तो अर्धी-अर्धी करेल. त्यानंतर अमिताभ यांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला की, आई आणि पत्नीने एकाच वेऴी आवाज दिला तर तो आधी कोणाकडे जाईल? यावर स्पर्धकाने म्हटलं की, तुम्ही मला घरी जावू देणार नाहीत का? पुढचा प्रश्न विचारण्याआधी स्पर्धकाने बिंग बी यांच्यापुढे हात जोडले.
अमिताभ बच्चन आणि स्पर्धकामधील संभाषणाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
KBC चा 13 वा सीझन (Kaun Banega Crorepati 13) 23 ऑगस्टला सुरु झाला. 2000 मध्ये, 'कौन बनेगा करोडपती'चा पहिला भाग 3 जुलै रोजी स्टार प्लसवर प्रसारित झाला होता, ज्याचे आयोजन अमिताभ बच्चन यांनी केले होते. तेव्हापासून केबीसीने खूप प्रगती केली आणि अनेकांचे नशीब बदलले.