सलमानसोबत दिल्लीला पोहचताच कतरिनाचा 'तो' फोटो व्हायरल; चाहते होतायेत Out of Control

कतरिना कैफ टायगर ३ सिनेमाच्या शूटींगसाठी सलमानसोबत दिल्लीला पोहचली होती.

Updated: Feb 16, 2022, 02:33 PM IST
सलमानसोबत दिल्लीला पोहचताच कतरिनाचा 'तो' फोटो व्हायरल; चाहते होतायेत Out of Control title=

मुंबई : कतरिना कैफ टायगर ३ सिनेमाच्या शूटींगसाठी सलमानसोबत दिल्लीला पोहचली होती. या दोघांचा एकत्र जाताना एअरपोर्टवरील फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कतरिना दिल्लीला पोहचताच आपल्या ओल्या केसांमधील  एक फोटो शेअर केलाय.जो पाहिल्यानंतर चाहते अभिनेत्रीवर फिदा होत आहेत.   

ओल्या केसात अभिनेत्री दिसतेय हॉट
कतरिना कैफने आपल्या इंस्टाग्राम अकांऊन्टवर हा फोटो कॅप्शनसोबत शेअर केलाय. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, 'विंटर सन' या फोटोत कतरिनाने पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केल्याचं दिसत आहे. आणि तिचे केस ओले आहेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. 

लूक पाहून प्रेमात पडाल
या फोटोत कतरिना खूपच गोड दिसत आहे. अभिनेत्रीने अगदी लाईट मेकअप केलाय. याचबरोबर या लूकसोबत अभिनेत्रीने केस मोकळे ठेवले आहेत. ज्यात तिचा लूक कातिलाना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विकी नाही तर कुणीतरी खास व्यक्तीने दिलंय गिफ्ट 
कतरिना कैफने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत कतरिनाने जेवणाच्या थाळीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर कतरिनाने कॅप्शनमध्ये खुलासा केला की, ही भेट विकी कौशलने दिली नसून तिला 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी कोणीतरी डिनर ट्रीट दिली आहे. विशेष म्हणजे व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवस आधी विकी कतरिनासोबत लंडनहून मुंबईला परतला.