'या' अभिनेत्यासोबत कतरिनाच्या बहिणीचा बॉलिवूड डेब्यू

'या' अभिनेत्यासोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Updated: Aug 3, 2019, 03:19 PM IST
'या' अभिनेत्यासोबत कतरिनाच्या बहिणीचा बॉलिवूड डेब्यू title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इसाबेल बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा होती. मात्र आता इसाबेल बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचं निश्चित झालं आहे. 

इसाबेल कैफ सलमान खानच्या मेव्हण्यासोबत, आयुष शर्मासोबत बॉलिवूड डेब्यू करणार आहे. इसाबेलचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर आयुष शर्माचा बॉलिवूडमध्ये हा दुसरा चित्रपट असणार आहे.

 
 
 
 

A post shared by Isabelle Kaif (@isakaif) on

आयुष शर्मा आणि इसाबेल कैफ 'क्वाथा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण बुतानी करत असून आयुष चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.

 
 
 
 

A post shared by Isabelle Kaif (@isakaif) on

'क्वाथा' चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट असणार आहे. 'क्वाथा' भारत आणि म्यानम्यार सीमेवरील एक गाव आहे. 

गेल्या वर्षभरापासून आयुष शर्मा त्याच्या शरीरावर मेहनत घेत होता. 'लवयात्री'मध्ये चॉकलेट बॉय लूकमध्ये दिसलेला आयुष शर्मा या चित्रपटातून अतिशय वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma) on

अर्पिता खानचा पती आयुष शर्माने 'लवयात्री' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. मात्र चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. त्यामुळे आता 'क्वाथा' चित्रपटातून तो काय कमाल करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.