लग्नाच्या काही महिन्यातच Katrina Kaif होणार आई? अभिनेत्रीच्या टीमकडून अखेर खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी लग्न झाल्यापासून खुप चर्चेत आहेत. सोशल मीडियावर दोघांचा एकत्र एक फोटो जरी पडला तरी या फोटोला तुफान रिस्पॉन्स मिळतो. आता तर कतरीना कैफ प्रेग्नेट असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या बातमीत नेमकं किती सत्य किती असत्य आहे ?  हेच आपण पडताळणार आहोत.  

Updated: May 12, 2022, 09:50 PM IST
लग्नाच्या काही महिन्यातच Katrina Kaif  होणार आई? अभिनेत्रीच्या टीमकडून अखेर खुलासा title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी लग्न झाल्यापासून खुप चर्चेत आहेत. सोशल मीडियावर दोघांचा एकत्र एक फोटो जरी पडला तरी या फोटोला तुफान रिस्पॉन्स मिळतो. आता तर कतरीना कैफ प्रेग्नेट असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या बातमीत नेमकं किती सत्य किती असत्य आहे ?  हेच आपण पडताळणार आहोत.  

कतरिना कैफ आणि विकी कौशल गेल्या 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. डेटिंग केल्यानंतर दोघांनी 2021 मध्ये लग्न केले. दरम्यान,आता काही दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नेट असल्याचे दावे सोशल मीडियावर केले जात आहे. अनेक दाव्यांमध्ये, असेही म्हटले जात आहे की,  कतरिना कैफ 2 महिन्यांची गर्भवती आहे. या व्हायरल बातम्यांचे सत्य काय आहे हे समोर आले आहे.

अशा उठल्या अफवा
काही दिवसांपुर्वीचं कतरिना कैफ मुंबई विमानतळावर अतिशय सैल सलवार-कुर्ता परिधान करून दिसली होती. या लूकमध्ये अनेकांनी तिला पाहिल्यावर सर्वांनाच धक्का बसला.नेहमीच टाईट कपडे परिधान करणाऱ्या कतरिनाने सैल कपडे घातले होते.  त्याचवेळी, या लूकनंतर सोशल मीडियावर कतरिनाच्या प्रेग्नंट असल्याचा दावा सुरू झाला.

कतरिनाची टीम म्हणाली ? 
हे वृत्त पसरताच कतरिना कैफच्या टीमने एक निवेदन जारी केले आहे. एका इग्रजी वृत्तत्राने दिलेल्या वृत्तानूसार, कतरिना कैफच्या टीमने हे सर्व दावे खोटे ठरवले आहेत. यासोबतच कतरिना प्रेग्नंट नसल्याचेही सांगितले आहे. 

कतरिना-विकी वेकेशन मोडवर 
कतरिना कैफ सध्या पती आणि अभिनेता विकी कौशलसोबत न्यूयॉर्कमध्ये आहे. जिथे ती खूप मस्ती करत आहे. या संबंधित फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच याआधी कतरिनाने विकी कौशलसोबतचा पूलचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

या फोटोमध्ये कतरिना विकीसोबत पूलमध्ये पांढऱ्या रंगाची मोनोकिनी परिधान करताना दिसली होती. हा फोटो शेअर करत कतरिनाने कॅप्शनमध्ये लिहिले - 'मी आणि माझे.' अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.