VIDEO : कतरिना कैफ प्रेग्नंट! ओढणी आणि हातानं लपवताना दिसली बेबी बंप?

Katrina Kaif  Pregnant : कतरिना कैफचा ईद पार्टीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, कतरिना सलमानची बहीण अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्माच्या घरी असलेल्या ईद पार्टीसाठी पोहोचली होती. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 23, 2023, 11:42 AM IST
VIDEO : कतरिना कैफ प्रेग्नंट! ओढणी आणि हातानं लपवताना दिसली बेबी बंप?  title=
(Photo Credit : Instant Bollywood Instagram)

Katrina Kaif  Pregnant : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे लोकप्रिय कप्लस पैकी एक आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशल हे 2021 साली लग्न बंधनात अडकले. त्या दोघांच्या लग्नानंतर अनेक वेळा कतरिना प्रेग्नंट आहे अशा चर्चा सुरु होत्या. त्यानंतर काल कतरिना काल सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या घरी असलेल्या ईद पार्टीमध्ये पोहोचली होती. त्यावेळचा तिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कतरिना प्रेग्नंट आहे अशा चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहे. खरंतर नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की कतरिना तिच्या ओढणीनं तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे. 

अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मानं त्यांच्या घरी या ईद पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात एक म्हणजे कतरिना कैफ. कतरिनानं यावेळी सैल कपडे परिधान केले होते. पापाराझींना पाहताच कतरिना त्यांना पोझ देण्यासाठी समोर उभी राहिली. पण पोझ देत असताना ती सतत तिची ओढणी सांभाळताना दिसली आणि तिचा हात सतत तिच्या पोटाच्या समोर घेऊन येत होती. त्यामुळे कतरिना प्रेग्नंट आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. कतरिना तिच्या ओढणीच्या मदतीनं आणि त्यानंतर हाताच्या सहाय्यानं तिचं बेबी बंप लपवत होती असं म्हटलं आहे. कतरिनाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या पार्टीत कतरिना कैफसोबत तिचा पती विकी कौशल दिसला नाही. तर अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत विकी कुठे आहे? आणि कतरिना तिचं बेबी बंप लपवते अशा कमेंट केल्या आहेत. नेटकरी इथेच थांबले नाही तर काहींनी ते घटस्फोट घेणार आहेत का? अशा कमेंट देखील केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ती तिची प्रेग्नंसी लपवते की मला असं वाटतयं... काहीही असेल पण मी तिच्यासाठी आनंदी आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, ती प्रेग्नंट आहे असं मला वाटतंय. ज्या प्रकारे ती स्वत: ला सांभाळते आणि कपडे परिधान करते त्यावरून तेच दिसतय. 

हेही वाचा : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मानसी नाईकनं घेतलं स्वत: चं घर, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

अर्पिताच्या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यात कार्तिक आर्यन, आमिर खान, एम एस धोनीची पत्नी साक्षी आणि लेक जिवा, शहनाज गिल, मनीष पॉल, हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा, जहीर इकबाल यांनी हजेरी लावली होती.