कॅमेरा खाली करा; Katrina Kaif पापाराझींवर 'या' कारणामुळे संतापली

Katrina Kaif चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Nov 19, 2022, 03:47 PM IST
कॅमेरा खाली करा; Katrina Kaif पापाराझींवर 'या' कारणामुळे संतापली title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. कधीच कोणी कतरिनाला रागात पाहिला नाही. मात्र, आता कतरिनाचा रागात असलेला लूक समोर आला आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Katrina Kaif Viral Video) 

हेही वाचा : Sushmita Sen ला शुभेच्छा देत लेकीचा Emotional Message; तुम्ही वाचला का?

या व्हिडिओमध्ये कतरिना कैफ कारमध्ये बसल्याचे दिसत आहे. त्यावेळी तिचा फोटो क्लिक करण्यासाठी पुढे सरकलेल्या पापाराझींवर कतरिना संतापली आहे. ती गाडीतून हातवारे करत पापाराझींना काही बोलते आणि काही क्षणातच ती गाडीतून उतरते आणि पापाराझींना फोटो खाली करण्यास सांगते. (Katrina Kaif Video) 

यावेळी कतरिना बोलते की तुम्ही कॅमेरा खाली करा, आम्ही इथे वर्कआऊट करायला आलोय. जर तुम्ही असं करालना... खाली करा... तुमचे कॅमेरे खाली करा. यानंतर पापाराझींनी कतरिनानची माफी मागितली. कामाच्या आघाडीवर, कतरिना कैफ अलीकडेच सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत 'फोन भूत' (Phone Bhoot) चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. मात्र, कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. लवकरच, कतरिना सलमान खानसोबत 'टायगर 3'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटातही दिसणार आहे. (Katrina Kaif gets upset with Paparazzi tells them Aap log camera neeche karo)