कार्तिक आर्यनला करण जोहरचा मोठा धक्का

कार्तिककडे अनेक बड्या सिनेमांच्या ऑफर्स

Updated: Jul 22, 2018, 10:17 AM IST
कार्तिक आर्यनला करण जोहरचा मोठा धक्का title=

मुंबई : 'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता कार्तिक आर्यन सध्या सातवे आसमानपर आहे. अनेक बड्या सिनेमांच्या ऑफर्स सध्या कार्तिककडे आहेत. पण त्याच्या एका चुकीमुळे एक मोठा सिनेमा कार्तिकच्या हातून निसटला आहे. कार्तिक करण जोहरच्या आगामी सिनेमात अक्षय कुमार आणि करीना कपूर खान बरोबर स्क्रिन शेअर करणार होता. पण कार्तिकनं या सिनेमासाठी मानधन वाढवून मागितल्यामुळे त्याला या सिनेमातून डच्चू देण्यात आला आहे.

कार्तिक आर्यन लवकरच जॅकलिनसोबत रोमांस करताना दिसणार आहे. बॉलिवूडमधील राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिषेक जैन हे कन्नड सुपरहिट सिनेमा 'किरिक पार्टी'चा हिंदी रिमेक बनवणार आहेत. 2016 मध्ये आलेल्या या सिनेमाने जोरदार कमाई केली होती. सिनेमाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली होती. 5 महिने हा सिनेमा थिएटरमध्ये सुरु होता.

कार्तिक आर्यनचा सिनेमा 'सोनू के टीटू की स्वीटी'ने बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती. या सिनेमात अभिनेत्री नुसरत भरूचा आणि अभिनेता सनी सिंह मुख्य भूमिकेत होते. 'सोनू के टीटू की स्वीटी' कार्तिक आर्यनचा पहिला असा सिनेमा आहे ज्याने 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. लव रंजन हे या सिनेमाचे दिग्दर्शक होते.