'दोन बायका फजिती ऐका', भर रस्त्यात उभं राहून बॉलिवूड अभिनेत्रींनी काय केलं? पाहा

 करीना कपूर आणि काजोल या स्टार्स अचानक रस्त्यात भेटल्या आणि त्यानंतर जे घडले ते ज्यांनी पाहिले त्यांचा यावर विश्वास बसत नव्हता. 

Updated: Mar 3, 2022, 08:07 PM IST
 'दोन बायका फजिती ऐका', भर रस्त्यात उभं राहून बॉलिवूड अभिनेत्रींनी काय केलं? पाहा title=

मुंबई : बॉलिवूडच्या सशक्त अभिनेत्री करीना कपूर आणि काजोल यांनी 'कभी खुशी कभी गम' सारख्या सुपरहिट चित्रपटात बहिणींची भूमिका साकारली होती. आज अनेक वर्षांनंतर या दोघींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ कोणत्याही चित्रपटाचा नाही, किंवा एखाद्या सेटवरचा नाही.  करीना कपूर आणि काजोल या स्टार्स अचानक रस्त्यात भेटल्या आणि त्यानंतर जे घडले ते ज्यांनी पाहिले त्यांचा यावर विश्वास बसत नव्हता. 

सामान्य महिलांप्रमाणे त्यांनी भेटताच एकमेकांना मिठी मारली, गप्पा मारायला सुरुवात केली. खूप वेळ या दोघीही भर रस्त्यात गाडी थांबवून चर्चा करु लागल्या.

ज्यामध्ये करीना कपूर आणि काजोल रस्त्याच्या मधोमध उभे राहून गप्पा मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मुंबईतील मेहबूब स्टुडिओ बाहेरचा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जिथे दोन्ही स्टार्सची अचानक भेट झाली. मग गोष्टींची मालिका अशी सुरू झाली की ना पापाराझींची पर्वा राहिली, ना जागेची.