Kareena Kapoor ची अजब फॅशन, जॅकेटची चेन उघडत दिली पोझ...

Kareena Kapoor च्या अजब फॅशनमुळे संतापले नेटकरी...म्हणाले, 'चेन तर लाव काकू' 

Updated: Oct 7, 2021, 08:51 PM IST
Kareena Kapoor ची अजब फॅशन, जॅकेटची चेन उघडत दिली पोझ... title=

मुंबई: बॉलिवूड स्टार करीना कपूर फॅशन आणि फिटनेसच्या बाबतीत खूप जास्त प्रसिद्ध आहे. बिनधास्त स्टाईलसाठी बेबोला बॉलिवूडमध्ये ओळखलं जातं. करीना कपूर पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. करीनाचा नवा लूक पाहिल्यानंतर तिला सोशल मीडियावर तुफान ट्रोल केलं जात आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. 

करीना कपूरच्या फॅशनचे लाखो चाहते आहेत. कधीकधी करिना तिच्या या फॅशनमुळे ट्रोल होते. नुकतंच अभिनेत्री शूटिंग ठिकाणी दिसली होती आणि या दरम्यान तिचा लूक व्हायरल झाला होता परंतु तिला तिच्या आउटफिटबद्दल ट्रोलही करण्यात आलं.

करीना कपूर मुंबईतील खार इथे गाडीतून उतरताना दिसली. यावेळी तिने ब्लॅक जॅकेट घातलं होतं. याच जॅकेटमुळे तिला ट्रोल करण्यात आलं. जेव्हा करीना कपूर गाडीतून उतरली तेव्हा तिचा स्वॅग वेगळाच होता. करीनाच्या जॅकेटची चेन उघडी होती. बरं ती एवढी उघडलेली होती की तिने जॅकेट का घातलं असावं असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

एका युझरने तर चक्क चेन लाव तू मुलांची आई आहेस असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या युझरने मलायका अरोराची दुसरी बहीण असल्याचं म्हटलं आहे. तिसऱ्या युझरने खूप जास्त गरम होतंय असं म्हटलं आहे. करीनाच्या या फॅशऩवरून तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. एका युझरने तर चक्क तिला काकू म्हटलं आहे.

करीना कपूर अंग्रेजी मीडियम सिनेमात शेवटचं दिसली होती. आता ती आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करीना आपल्या चाहत्यांना तिच्या इन्स्टा पोस्टवरून वेगवेगळे अपडेट्सही देत असते.