अभिनेत्री करिना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नंट? करीना कपूरचे नवीन फोटो व्हायरल...

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान दोन्ही मुलांसोबत बराच काळ लंडनमध्ये आहे.

Updated: Jul 18, 2022, 06:41 PM IST
अभिनेत्री करिना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नंट? करीना कपूरचे नवीन फोटो व्हायरल... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान दोन्ही मुलांसोबत बराच काळ लंडनमध्ये आहे. नुकतीच करीना तिच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या बातमीमुळे चर्चेत आली आहे. यासोबतच अभिनेत्रीचा एक फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. करिनाच्या बेबी बंपचा हा फोटो लेटेस्ट आहे की जुना फोटो व्हायरल होत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आता तिसर्‍या गरोदरपणाच्या बातम्यांदरम्यान, करिनाने सोशल मीडियावर ताजे फोटो पोस्ट केले आहेत, जे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. खुद्द करिनाने हे फोटो तिच्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केले आहेत.  

या फोटोंमध्ये करिना लहान मुलगा जेहसोबत लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यासोबतच करीना सैल कपड्यांमध्ये दिसत आहे. त्यामुळे तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी अधिकच जोर धरला आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये करीना मुलगा जेहसोबत अतिशय कुल स्टाईलमध्ये दिसत आहे. यासोबतच करिनाने न्यूड मेकअप आणि सनग्लासेससह तिचा लूक पूर्ण केला आहे.

कपूर कुटुंबाने नीतू कपूरचा वाढदिवस 8 जुलै 2022 रोजी लंडनमध्ये साजरा केला. फॅमेली फोटोंमध्ये, बेबो  सैफ आणि तिची बहीण करिश्मा कपूरच्या मागे पोज देताना दिसतेय.

गर्ल्स-डे-आऊटमधील इतर फोटोंमध्ये, मलायका अरोरा, अमृता अरोरा, करिश्मा कपूर आणि नताशा पूनावाला यांच्यासह करिनाने तिच्या जबरदस्त लुक्सने लोकांना थक्क केलं. जरी बेबोने सिक्विन ब्लॅक ड्रेस घातला होता. परंतु काळजीपूर्वक पाहिलं तर या फोटोमंध्ये तिचे पोट फुगलेलं दिसतंय आणि यामुळे तिच्या तिसऱ्या प्रेग्नंसीची अटकळ बांधली जात आहे.