अर्रsss... मंत्र्याचा भलताच स्वॅग, करिनाकडे वळूनही नाही पाहिलं

राज्यातल्या एका मंत्र्याने करिनाकडे साधं पाहिलंही नसल्याने हा मंत्री सध्या भलताच चर्चेत आहे.

Updated: May 10, 2022, 01:08 PM IST
अर्रsss... मंत्र्याचा भलताच स्वॅग, करिनाकडे वळूनही नाही पाहिलं title=

बॉलिवूड सेलिब्रिटी नेहमीच एअरपोर्टवर स्पॉट होतात. या सेलिब्रिटीजना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नेहमीच पापाराझींसह चाहत्यांची झुंबड उडते. अनेकदा राजकीय नेतेही कलाकारांचे मोठे चाहते असतात. मात्र राज्यातल्या एका मंत्र्याने करिनाकडे साधं पाहिलंही नसल्याने हा मंत्री सध्या भलताच चर्चेत आहे.

करिना कपूर मुलगा जेहसह प्रायव्हेट जेटने जाण्यासाठी एअरपोर्टवर जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सर्वांचे कॅमेरे करिनाकडे वळाले आहेत.मात्र मंत्रीसाहेबांचा स्वॅग असा दिसला की, त्यांनी शेजारून जाणाऱ्या करिनाकडे साधं पाहिलंही नाही, त्यामुळे करिनाचाही शॉकिंग लूक व्हिडीओत दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हे मंत्री दुसरे -तिसरे कुणी नसून महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आहेत. एअरपोर्टवर आपल्या सहकाऱ्यांसह ते सुद्धा एअरपोर्टवर दिसत आहेत. फोटोग्राफर्स करिनाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी तिचा पाठलाग करत आहेत मात्र सामंतांनी शेजारून जाणाऱ्या करिनाकडे साधं पाहिलंही नाही. त्यामुळे सामंतांचा स्वॅगची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

उदय सामंत हे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर रत्‍नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.