मोठी बातमी : भारतीय कलाजगताला धक्का; दिग्गज कलाकाराचं निधन

लतादीदींमागमोमाग भारतीय संगीत जगतातून आणखी एक तारा निखळला...   

Updated: May 10, 2022, 01:42 PM IST
मोठी बातमी : भारतीय कलाजगताला धक्का; दिग्गज कलाकाराचं निधन  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : भारतीय संगीत विश्व आणि एकंदरच भारतीय कलाक्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या एका मोठ्या व्यक्तिमत्त्वानं जगाचा निरोप घेतला. संगीत क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या नावाजलेल्या संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या जीवनाची कारकिर्द इथंच संपली. (pt shiv kumar sharma demise)

शर्मा यांच्या निधनाचं वृत्त कळताच कलाविश्वातून अनेकांनीच हळहळ व्यक्त केली. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही काळापासून त्यांना किडनीच्या त्रासानं ग्रासलं होतं. 

अखेरच्या सहा महिन्यांमध्ये ते डायलिसिसवरही होते असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, कार्डीअॅक अरेस्टमुलं त्यांचं निधन झालं. 

जम्मू काश्मीरमधील संतूर नामक वाद्याला शर्मा यांनी जागतिक ख्यातीवर नेऊन ठेवलं. सतार आणि सरोद अशा वाद्यांसोबत संतूरचंही नाव घेतलं जाऊ लागलं. संगीत क्षेत्रात शर्मा यांच्या योगदानाची दखल शासन दरबारीसुद्धा घेण्यात आली होती. 

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबतची त्यांची जोडगोळी विशेष गाजली, त्यांना 'शिवहरी' म्हणूनही ओळखलं जात होतं. आज हे दिग्गज नाव, व्यक्तीमत्त्वं आपल्यात नसलं तरी त्यांच्या कलाकृती त्यांना कायमच अजरामर ठेवतील यात शंका नाही. झी 24 तासकजडून पंडित शिवकुमार शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.