mother's day special; दोन्ही मुलांसह करिना कपूरचा स्वीमिंग पूलमध्ये cool अंदाज

करीना कपूर खानने मदर्स डे निमित्त तिच्या दोन्ही मुलांसोबत एक खास फोटो पोस्ट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: May 8, 2022, 03:21 PM IST
mother's day special; दोन्ही मुलांसह करिना कपूरचा स्वीमिंग पूलमध्ये cool अंदाज title=

मुंबईः करीना कपूर खानने मदर्स डे निमित्त तिच्या दोन्ही मुलांसोबत एक खास फोटो पोस्ट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. करिनाचा हा फोटो काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने मदर्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. बेबोने इंस्टाग्रामवर तिच्या दोन मुलांसोबतचा एक जबरदस्त फोटो पोस्ट केला आहे जो काही मिनिटांतच वेगाने व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या या छायाचित्रात पतौडी बेगम आपल्या दोन्ही मुलांसोबत पाण्यात मस्ती करताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करीना कपूरने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये, आपण पाहू शकता की बेबो तिच्या दोन्ही मुलांसह पाण्यात एन्जॉय करताना दिसत आहे. यासोबतच तिचा हा फोटो शेअर करत करीना कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, The length and breadth of my life, यासोबतच करीना कपूरने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी देखील बनवले आहेत.

करीना कपूरने हे फोटो सोशल मीडियावर टाकताच काही मिनिटांत या फोटोवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. अभिनेत्रीची ही सुपरकूल स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे. सर्व चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटीही या पोस्टला लाईक आणि कमेंट करत आहेत.

प्रेग्नेंसीनंतर करीना कपूर तिच्या वाढलेल्या वजनामुळे खूप चर्चेत होती. मात्र करिनाने योगा आणि वर्कआउट्सच्या मदतीने लवकरच वेट लॉस केलं. वर्कआउटसोबतच करीना हेल्दी डाएटही फॉलो करते.