Kareena Kapoor Baby Bump : गरोदरपणा योगात करणाऱ्या बेबोचे फोटो

करीना गरोदरपणातील अनुभव पुस्तकरुपातून मांडणार 

Updated: Jan 26, 2021, 01:36 PM IST
Kareena Kapoor Baby Bump : गरोदरपणा योगात करणाऱ्या बेबोचे फोटो  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्या गरोदरपणात अतिशय कूल असतात. त्या आपली प्रेग्नेंसी खूप एन्जॉय (Baby Bump) करत असतात. बेबो गरोदरपणातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोमवारी करीनाने काही फोटो पोस्ट केलेत. ज्या फोटोत ती योगा करताना दिसत आहे. बेबोचे हे फोटो व्हायरल होत आहेत. ट्विटरवर देखील करीना कपूर खान ट्रेंड होत आहे. 

करीना काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये योगा करताना दिसत आहे. या फोटोत करीनाचे बेबी बंप दिसत आहेत. करीनाने या फोटोला कॅप्शन दिली आहे की,'करंट मूड.... अधिक स्ट्रेच'. करीनाने हा फोटो एका फोटोशूटचा भाग आहेत. तसेच करीना नुकतीच नव्या घरात सिफ्ट झाली आहे. ज्याची झलक या फोटोत दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करीना आपल्या दुसऱ्या गरोदरपणाचा अनुभव पुस्तकातून मांडणार आहे. याबाबतची माहिती तिने तैमूरच्या वाढदिवसादिवशी केली आहे. या पुस्तकाचं नाव करीनाने 'प्रेग्नेंसी बायबल' असं म्हटलंय. हे पुस्तक याचं वर्षी प्रदर्शित होणार आहे. करीनाने म्हटलंय की,'ज्या महिला आई होणार आहेत. त्यांच्यासाठी करीना कपूर खान 'प्रेग्नेंसी बायबल'ची घोषणा केली आहे. या पुस्तकात करीनाने डाएट ते मॉर्निंग सिकनेस आणि फिटनेसबद्दलही लिहिलं आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील गरोदरपणातील योगा करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. अनुष्काने नुकतंच गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळ आणि अनुष्का सुखरुप असल्याचं विराट कोहलीने ट्विट करून सांगितलं आहे.