कारभारी लयभारी : राजवीर पियूला देणार प्रेमाची कबुली !

मालिका नव्या वळणार 

Updated: Feb 1, 2021, 05:07 PM IST
कारभारी लयभारी :  राजवीर पियूला देणार प्रेमाची कबुली ! title=

मुंबई : राजकारणावर बेतलेली कारभारी लयभारी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे, सूर्यवंशी आणि पाटील ही दोन राजकीय घराणी आणि त्यांच्यात असलेले राजकीय वैर हे सर्वज्ञात आहे. पियू आपणच विरोधी पक्षातल्या अंकुशराव पाटलाची मुलगी आहोत ही तिची खरी ओळख वीरु पासून दडवून ठेवली होती.

पियूकडून घडलेल्या एका नकळत कृतीपायी राजवीर अडचणीत आला होता त्यामुळे राजवीर आणि पियू मध्ये खटके उडत होते, पण आता त्यांची मैत्री झालेय, वीरू ला पियूच्या वागण्याबोलण्यातून तिला तो आवडत असल्याचं वाटतं. वीरू पियुला प्रपोज करायचं ठरवतो खूप प्रयत्नांती तो प्रियांका ला प्रपोज करतो.

आता ह्यावर पियूचं उत्तर काय असेल, ती सुद्धा या प्रेमाला होकार देईल की आपले वडील अंकुशराव पाटील ह्यांना घाबरून राजवीरला कायमचं विसरेल या उत्तरांसाठी पाहत राहा “कारभारी लयभारी” सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा. आपल्या झी मराठीवर.