Karan Johar Speciality around Sex: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर (Karan Johar) हा कोणत्या न कोणत्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतो. मग त्याचे चित्रपट असो, किंवा वैयक्तिक आयुष्य असो. तो त्याच्या बोल्ड स्टेटमेंटसाठी अनेकदा चर्चेत येतो. हे बोल्ड स्टेटमेंट अनेकदा त्याच्या चॅट शो, कॉफी विथ करण (Koffee With Karan) मध्ये तो देऊन तो शो हिट करत असतो. या शो मध्ये करण जोहर आलेल्या पाहुण्यांसोबत त्यांच्या बेडरूमशी संबंधित अशा अनेक गोष्टींबद्दल बोलतो. करणच्या शोच्या एका एपिसोडमध्ये त्याच्या एका पाहुण्याने खुलासा केला आहे की करण त्याचा शो हिट करण्यासाठी 'सेक्स'ची मदत घेतो. हे पाहुणे कोण आहेत आणि त्यांना काय म्हणायचे आहे, चला जाणून घेऊया.
कॉफी विथ करण मध्ये अनेक मोठे कलाकार आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींवर खुलासा करतात. असाच एक खुलासा 2017 मध्ये, कॉमेडीयन कपिल शर्मा (Kapil Sharma) कॉफी विथ करणच्या एका एपिसोडमध्ये दिसला जिथे कपिल आणि करणने विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान, कपिलला विचारलेल्या 'सेक्स'शी (Sex) संबंधित प्रश्न टाळण्यासाठी तो म्हणाला होता की, करण आपला शो चालवण्यासाठी सेक्सची मदत घेतो आणि सर्व काही सेक्सभोवती फिरते. आणि त्यामुळेच हा शो मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतोय.
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा करणने कपिलला विचारले की तो सेक्ससाठी काय करतो. सुरुवातीला कपिल यावर गप्प राहिला पण थोड्या वेळाने त्याने सांगितले की सेक्सबद्दल बोलणे ही करणची खासियत आहे आणि तो राजकीय अर्थव्यवस्थेची चर्चासुद्धा सेक्सकडे नेऊ शकतो.
करणला कपिलचा राग आला आणि त्याने कबूल केले की 'सेक्स' ही त्याची खासियत आहे आणि अनेक वेळा त्याच्या आईनेही त्याला सांगितले आहे की कदाचित प्रत्येकाला असे बोलणे सोयीचे नसते आणि अशा परिस्थितीत त्याच्यावर थोडे नियंत्रण राहिले पाहिजे. करण म्हणाला की तो कोणत्याही विषयाला 'सेक्शुअल' बनवू शकतो पण आता तो सेक्सवर जास्त न बोलण्याचा प्रयत्न करेल असेही त्याने सांगितले.