करणच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाला 'या' सेलिब्रेटींची उपस्थिती...

गेल्या वर्षी सरोगसीच्या मदतीने करण जोहरने दोन जुळ्या मुलांचा पिता झाला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 8, 2018, 05:46 PM IST
करणच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाला 'या' सेलिब्रेटींची उपस्थिती... title=

नवी दिल्ली : गेल्या वर्षी सरोगसीच्या मदतीने करण जोहरने दोन जुळ्या मुलांचा पिता झाला. ही मुले आता वर्षाची झाली असून बुधवारी त्यांचा पहिला वाढदिवस होता. या वाढदिवसाचे अगदी जबरदस्त सेलिब्रेशन झाले. करणच्या यश आणि रुही या दोन्ही मुलांच्या बर्थडे पार्टीला आलिया भट्ट. करिना कपूर, रानी मुखर्जी, सिद्धार्थ मल्होत्रा या स्टार्सने हजेरी लावली. या पार्टीचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

सेलिब्रेशनमध्ये सेलिब्रेटी

या सेलिब्रेशनला सिद्धार्थ आणि आलिया दोघेही उपस्थित असतील तरी दोघे एकत्र दिसले नाहीत. सिद्धार्थ अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हीच्या सोबत दिसला. दोघांनी रुही आणि यश असे लिहिलेले टी शर्ट घातले होते. तर आलियाने कतरिनासोबत पार्टीत प्रवेश केला. 
पार्टीचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. 

 

 

#girlssquadgoals

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

 

Team Roohi n Yash #jerseygang #birthdayparty @shwetabachchan @putlu

A post shared by Sidharth Malhotra (@s1dofficial) on

 

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

 

May you live to be a 103! Happy birthday my beautiful siblings 

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on

अशी ठेवली मुलांची नावे

यश आणि रुही ही नावे करणने त्याच्या आई वडिलांच्या नावावरून ठेवली आहेत. मुलाला वडिलांचे यश जोहर यांचे नाव दिले आहे. आई हिरु जोहरवरून त्याने आपल्या मुलीचे नाव रुही ठेवले आहे.