'हा' पाकिस्तानी चित्रपट पाहण्यासाठी करण जोहरचं मोठ पाऊल?

करण जोहरचे थिएटरमधले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Oct 30, 2022, 11:43 AM IST
'हा' पाकिस्तानी चित्रपट पाहण्यासाठी करण जोहरचं मोठ पाऊल?  title=

मुंबई : पाकिस्तानी चित्रपट (Pakistani Film) 'द लेजेंड ऑफ मौला जट' (The Legend Of Maula Jatt) हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी फक्त पाकिस्तानीच नाही तर ब्रिटन आणि अमेरिकेतील प्रेक्षकही गर्दी करत आहेत. सोशल मीडियानुसार, मौला जटचं वेड आता बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरलाही (Karan Johar)  लागलं आहे. सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत आणि ते शेअर करून असे म्हटले जात आहे की हा करण जोहर थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाचा आनंद घेत आहे.

पाकिस्तानी वेबसाइट 'द करंट पीके'नं काही फोटोंचं कोलाज शेअर केलं आहे. यामध्ये करण जोहरसारखा दिसणारी कोणती तरी व्यक्ती ही थिएटरमध्ये दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये एका नेटकऱ्यानेही स्टोरी शेअर करत  त्याची इन्स्टास्टोरी शेअर केली आहे. त्यावर 'करण जोहर मौला जट पाहत आहे', असे कॅप्शन देण्यात आले आहे. हे फोटो पाहून अनेक चाहते आनंदी आणि उत्साहित झाले आहेत. त्याच वेळी, अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हे सत्य स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Karan Johar watched pakistani film the legend of maula jatt photo gone viral

या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एक नेटकरी म्हणाला की, 'हा तो नाही. तो आरामात त्याच्या घरी चित्रपट पाहू शकतो. त्याला थिएटरमध्ये जाण्याची गरज नाही. पैसा कामी येतो.' दुसऱ्याने नेटकरी म्हणाला, 'तो असं काही पाहत नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हाहाहा, तो पाकिस्तानमध्ये काय करत आहेत?' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'आता तो स्टार किड्स घेऊन हा चित्रपट कॉपी करेल आणि यात आयटंम सॉंग आणि विचित्र डायलॉग असतील. हो की नाही केजो! (Karan Johar watched pakistani film the legend of maula jatt photo gone viral) 

याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी फोटो शेअर करत त्यांचं मत दिले आहे. काही नेटकऱ्यांनी  म्हणाले की, हा करण जोहरसारखा दिसणारा व्यक्ती आहे. तर अनेकांचे म्हणणे आहे की मित्र फवाद खानसाठी करण त्याचा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेला. काही यूजर्स फोटो पाहून हसत आहेत.

पाकिस्तानी चित्रपट 'द लेजेंड ऑफ मौला जट'नं प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील हा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे म्हटलं जात आहे. या चित्रपटानं अवघ्या 10 दिवसांत जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता. 13 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या 'द लेजेंड ऑफ मौला जट' संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटाने यूएस आणि यूके बॉक्स ऑफिसवर 'थँक गॉड' आणि 'राम सेतू' या नवीन भारतीय चित्रपटांना मागे टाकले आहे.