2019 मध्ये सलमान खान करणार लग्न, करण जोहरचा खुलासा

करण जोहरने केला खुलासा 

2019 मध्ये सलमान खान करणार लग्न, करण जोहरचा खुलासा  title=

मुंबई : आपल्या सिनेमांप्रमाणेच दिग्दर्शक करण जोहर आपल्या 'कॉफी विथ करण' या शोसाठी देखील लोकप्रिय आहे. करण जोहरच्या या शोमध्ये उपस्थित राहणाऱ्या कलाकारांची वेगळीच चर्चा असते. पण आता सध्या करण जोहरची चर्चा जास्त आहे. 

कारण करण जोहर नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर विथ नेहा' या शोमध्ये आला होता. या ठिकाणी करण जोहरने अतिशय महत्वाचा खुलासा केला आहे.

अगदी जदबुडी कधी होणार? तिसरं महायुद्ध होणार की नाही? यापेक्षा अनेकांना सलमान खान कधी लग्न करणार? हा यक्ष प्रश्न वाटतो. आणि या मुलाखतीत करण जोहरने याबाबतच महत्वाचा खुलासा केला आहे. 

सलमान खानच्या लग्नाबाबत करण जोहरला प्रश्न विचारण्यात आल्यावर करण जोहरने हसत उत्तर दिलं. तो म्हणाला की, सलमान खान 2019 मध्ये लग्न करणार आहे. हे लग्न कुणा मुलीशी नाही तर तीन ब्लॉकबस्टर सिनेमांशी करणार आहे. 

असो, नुकताच सलमान खानने आपला 53 वा वाढदिवस साजरा केला आहे. पण सलमान खानचा सध्या लग्न करण्याचा काहीच मूड दिसत नाही.

पण 2019 मध्ये सलमान खान खूप मोठे सिनेमे घेऊन येत आहे. पुढच्या वर्षी 2019 मध्ये 'भारत' हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. 

सुल्तान आणि टायगर जिंदा है या दोन सिनेमांनतर सलमान-अली अब्बास जफर ही जोडी तिसऱ्यांदा एकत्र सिनेमा करत आहे. तसेच हा सिनेमा अतिशय वेगळा असल्याचं म्हटलं आहे. 

'भारत'नंतर सलमान खान बॅक टू बॅक सिनेमांमध्ये व्यस्त आहे. ईद 2019 मध्ये अली अब्बास जफर यांच्या 'भारत' नंतर सलमान खान 'दबंग 3' चं शुटिंग करणार आहे. अशातच 'किक 2' ची चर्चा आहे पण हा सिनेमा 2020 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.