करण जोहरने खास व्यक्तीसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय, ज्यामुळे...

करण जोहरच्या त्या एका गोष्टीमुळे पुन्हा रंगणार चर्चा.... ज्यामुळे अनेकांचं करियर...  

Updated: Mar 3, 2022, 01:58 PM IST
करण जोहरने खास व्यक्तीसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय, ज्यामुळे... title=

मुंबई : दिग्दर्शक करण जोहरने अनेक स्टारकिड्सला बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. आलिया भट्ट, वरुण धवन, अनन्या पांडे यांच्यासोबतचं आणखी एका स्टार किडला बॉलिवूडमध्ये लाँच करण्यासाठी करण सज्ज झाला आहे. करण जोहर शनाया कपूरला बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे. अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार  असल्याच्या बातम्या येत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावर्षी शनाया एका मोठ्या सिनेमात दिसू शकते. करण जोहरनं धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली, शनाया कपूरला लाँच केल्याची घोषणा केल्यानंतर आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. शनायाने सिनेमाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

सिनेमात शनाया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सिनेमाचा पोस्टर शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'धर्मा कुटुंबात पदार्पण केल्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. मी नव्या प्रवासासाठी उत्साही आहे. मला आता तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे...'

शनाया शिवाय दोन अभिनेते बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनाया कपूर, लक्ष्य आणि गुरफतेह परजादा तिघे 'बेधडक' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्याच्या भेटीस येणार आहेत