नुकतंच लग्न झालेला सनी देओलचा मुलगा हनिमूनला गेलाय 'या' महागड्या ठिकाणी

Karan Deol Honeymoon: करण देओल आता आपल्या पत्नीसह हनिमूनला रवाना झाला आहे. त्यानं काही फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या या हनिमून डेस्टिनेशनचीच सगळीकडे चर्चा रंगलेली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 24, 2023, 05:45 PM IST
नुकतंच लग्न झालेला सनी देओलचा मुलगा हनिमूनला गेलाय 'या' महागड्या ठिकाणी title=
June 24, 2023 | karan deol and his wife drisha acharya gone for honeymoon at himachal pradesh photos went viral

Karan Deol Honeymoon: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलच्या मोठ्या मुलाची. सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल हा नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. 18 जून रोजी तो विवाहबंधनात अडकला. द्रिशा आचार्यसोबत तो आता एका महागड्या लोकेशनवर हनिमूनसाठी गेला असून त्यानं आपल्या हनिमूनच्या ठिकाणाचे काही फोटोही शेअर केले आहेत. इन्टाग्राम स्टोरीवरून त्यानं काही फोटोज हे शेअर केले आहेत ज्यात तो आणि द्रिशा आपला मी टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या या हनिमुन डेस्टिनेशनची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण आणि द्रिशा हे दोघंही हिमाचलच्या मनालीमध्ये पोहचले आहेत. तिथून त्यांनी आपल्या काही फोटोही शेअर केले आहेत. सध्या त्यांच्या फोटोंवरून वाटतं आहे की ते आपले खास क्षण चांगलेच एन्जॉय करतायत.  

करणनं हिमाचल प्रदेशातील सुंदर निसर्गाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे तेथील वातावरणाचे फोटोही त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. सध्या त्यानं तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचे काही फोटो इन्टाग्राम स्टोरीवर टाकले हेत. ज्यात तुम्ही पाहू शकता की, सुंदर हिरवागार डोंगर दिसतो आहे सोबतच सुर्यास्ताचाही त्यानं फोटो शेअर केला आहे. त्यामुळे त्याच्या या फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा आहे. करणनं एका कॉटेजमधील फोटो शेअर केले आहेत ज्यात तो मस्तपैंकी चिमणीच्या आडोशात बसलेला दिसतो आहे. यातून तिथे किती थंडी असेल याची कल्पना येते. तिथे सौम्य प्रमाणात पाऊसही पडतो आहे. त्यामुळे अशा ठिकाणी आपल्यापैंकी प्रत्येकालाच जायची इच्छा होईल. 

करणची पत्नी द्रिशानंही आपल्या या टूरचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे तिच्या अकांऊटवरही चाहत्यांनी उड्या ठोकल्या आहे. तिनंही एका हॉटेलमधला फोटो शेअर केला आहे ज्यात ते ब्रेकफास्ट करताना दिसत आहेत. करण देओल आणि द्रिशा आचार्य यांच्या लग्नांची चांगलीच चर्चा रंगली होती. या महिन्याच्या सुरूवातीपासूनच त्याच्या लग्नाचे फोटो हे व्हायरल होयला सुरूवात झाली होती. त्यामुळे त्याची बरीच चर्चा रंगली होती. सुरूवातीला त्याच्या रोका सेरेमनीचे फोटो हे व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्या संगीत सेरेमनीचेही फोटो हे शेअर झाले होते. तेही जोरात व्हायरल झाले होते. 

हेही वाचा - शाळेत असतानाही सलमानने घेतलेली 'त्या' मुलांच्या जेवणाची जबाबदारी; सोनाली बेंद्रनं सांगितला किस्सा

त्यांच्या लग्नामध्ये सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे सनी देओलच्या डान्सची आणि धर्मेंद्र यांच्या डान्सची. त्यांच्या डान्समुळे ते दोघंही चांगलेच चर्चेत आले होते.