कपिल शर्माला हॉलिवूडची ऑफर

स्टार कॉमेडियन - अभिनेता कपिल शर्मा बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर त्याला हॉलिवूडच्याही ऑफर मिळू लागल्यात. 

Updated: Nov 25, 2017, 05:34 PM IST
कपिल शर्माला हॉलिवूडची ऑफर  title=

मुंबई : स्टार कॉमेडियन - अभिनेता कपिल शर्मा बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर त्याला हॉलिवूडच्याही ऑफर मिळू लागल्यात. 

मिळालेल्या माहितीनुसार, 'किस किस को प्यार करू' आणि 'फिरंगी'नंतर कपिलला एका हॉलिवूड सिनेमाची ऑफर मिळालीय. 

या हॉलिवूड सिनेमात कपिलला अभिनयासोबत गाणं गाण्याची संधी मिळणार आहे. कपिलला 'बॅड मामाज' नावाच्या एका कंपनीनं ही ऑफर दिलीय. कपिलसोबत त्यांना एक पूर्ण सीरिज बनवण्याची इच्छा आहे. सिनेमात एक हॉलिवूड आणि एक भारतीय स्टार असेल. 

'फिरंगी'चे दिग्दर्शक राजीव धिंगरा यांनी ही माहिती दिलीय. 'कॉमेडी करी' असं या सिनेमाचं नाव असण्याची शक्यता आहे. 

उल्लेखनीय म्हणजे, कपिल शर्माचा फिरंगी हा सिनेमा 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.