प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; झोपेतचं घेतला अखेरचा श्वास

सिने विश्वाला मोठा धक्का 

Updated: Jul 26, 2021, 01:38 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; झोपेतचं घेतला अखेरचा श्वास title=

मुंबई : सोमवारी सकाळीचं सीने प्रेमींना धक्का देणारी बातमी समोर येत आहे. कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जयंती यांचं निधन झालं आहे. त्यांनी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त चित्रपटांध्ये काम केलं आहे. जयंती यांचा मुलगा कृष्णा कुमारने अभिनेत्रीच्या निधनाची बातमी दिली आहे. वयाशी संबंधित समस्यांमुळे त्या अस्वस्थ होत्या. झोपेतचं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान 2018 साली त्यांच्या निधनाची अफवा पसरली. 

तेव्हा खुद्द जयंती समोर आल्या आणि रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला. जयंती यांचा जन्म 6 जानेवारी 1945 कर्नाटकमध्ये झाला. जयंती यांनी त्यांच्या करियरची सुरूवात बाल कलाकार म्हणून केली. त्यांनी अभिनय, प्रॉडक्शन आणि संगीत श्रेत्रात देखील काम केलं. 60 ते 80च्या दशकानंतर त्यांचं नाव प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत आलं.

जयंती यांनी जेमिनी गणेशन, MGR आणि जयललिता यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. जयंती यांनी बॉलिवूडमध्ये देखील काम केलं. त्यांनी 'बहुरानियां', 'तुमसे अच्छा कौन है' आणि 'गुंडा' या तीन चित्रपटांमध्ये काम केलं आहे.