मुंबई : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत फाटक्या जिन्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आता या प्रकरणात अभिनेत्री कंगना रानौतने उडी घेतली आहे. कंगना कायम सामाजिक, राजकीय आणि चालू घडामोडींवर भाष्य करत असते. आता देखील फाटक्या जिन्स प्रकरणी केलेल्या वक्तव्यामुळे कंगना चर्चेत आली आहे. तीरथ सिंह यांच्या फाटक्या जिन्सवरील वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे.
पण अभिनेत्री कंगनाने वेगळ्या अंदाजात फाटक्या जिन्स प्रकरणी स्वःताचं मत मांडलं आहे. ती म्हणाली, 'जर तुम्हाला रिप्ड जिन्स घालायची असेल तर सुनिश्चित करा की त्यामध्ये कुलनेस तेवढीचं असावी जेवढी फोटोंमध्ये दाखवली आहे. ज्यामध्ये तुमच्या स्टाईलची झलक दिसेल तुम्हाला भिकारी असल्यासारखं वाटणार नाही. '
If you want to wear ripped jeans make sure coolness quotient is of this magnitude as in these pics, so that it looks like your style not your state a homeless beggar who hasn’t got allowance from parents this month, most young people look like that these days #RippedJeansTwitter pic.twitter.com/hc14cLxQDE
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 18, 2021
शिवाय आजच्या काळात अनेक जण रिप्ड जिन्स घालतात असं देखील ती म्हाणाली. स्वतःचे रिप्ड जिन्समधील फोटो शेअर करत तिने मत मांडलं आहे. दरम्यान, तीरथ सिंह रिप्ड जिन्स घावणाऱ्या महिलांवर टीका केली. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
काय म्हणाले तीरथ सिंह
‘मी एकदा जहाजातून प्रवास करत होतो, तेव्हा तिथे एक महिला आपल्या २ मुलांसोबत होती, आणि तिने फाटलेली जीन्स घातलेली. मी जेव्हा तिला विचारलं की तुम्हाला कुठे जायचं आहे? तेव्हा तिने सांगितलं की मी दिल्लीला जात आहे. माझे पती JNU मध्ये प्राध्यापक आहेत, आणि मी एक NGO चालवते.’
पुढे रावत म्हणाले, ‘तेव्हा मी विचार केला की, जर NGO चालवणारी महिला असे कपडे परिधान करत असेल, तर ती समाजाला कशाप्रकारे संस्कार घडवेल? आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं कधीच नसायचं. मुलांवर कसे संस्कार होतायत, हे सर्वस्वी पालकांवर असतं, असंही मुख्यमंत्री रावत यांचं मानणं आहे.