मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत तिच्या अभिनयासह अनेकदा अनेक वादांमुळेही चर्चेत असते. देशातील अनेक चालू घडामोडींवर ती नेहमीच खुलेपणाने आपलं मत मांडत असते. आता काश्मीरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचार आणि हिंसेबाबत कंगनाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कंगनाने कडक शब्दांत बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे.
'बॉलिवूडमधील कलाकार किंवा बुद्धीजीवी समजणारे लोक हातात मेणबत्ती घेऊन, कार्ड्स घेऊन रस्त्यांवर येतात, परंतु त्यांची ही माणूसकी एखादा अजेंडा असल्यावरच बाहेर येते. जोपर्यंत कोणताही अजेंडा नसतो तोपर्यंत असे लोक कोणाच्याही मदतीसाठी पुढे येत नाही, एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी ते पुढे येत नाहीत' अशा शब्दांत कंगनाने बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे.
कंगनाने अजय पंडित यांच्या हत्येच्या मुद्द्यावर काश्मीरमधील इस्लामबाबतच्या इतिहासाचाही उल्लेख केला आहे. त्याशिवाय कंगनाने अजय पंडित यांच्या हत्येबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे त्यांच्या न्यायासाठी आणि याप्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
#KanganaRanaut calls out selective secularism of Bollywood and so-called liberals and urges @narendramodi @PMOIndia to take strict action against atrocities done on #KashmiriPandits and their safe return to their homeland. #AjayPandita #JusticeForAjayPandita pic.twitter.com/gy6PxxkzEh
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) June 10, 2020
दरम्यान, कंगनाने नुकतीचं तिच्या आगामी 'अपराजित आयोध्या' (Aprajit Ayodhya) या चित्रपटाची घोषणा केली. 'अपराजित आयोध्या' चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि निर्मितीचीही धुरा कंगनाचं सांभाळणार आहे.