Farmers Protest: कंगनाने साधला प्रियंका आणि दिलजीतवर निशाणा

कंगना सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनावर व्यक्त होत आहे.   

Updated: Dec 11, 2020, 04:10 PM IST
Farmers Protest: कंगनाने साधला प्रियंका आणि दिलजीतवर निशाणा title=

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतने देशात सुरू असलेल्या शेककरी आंदोलनावर एकवेळा नाही तर अनेकवेळा आपला आवाज सोशल मीडियाच्या माध्यमातून बुलंद केला. दरम्यान पुन्हा एकदा ट्विट करून तिने सर्वांच्या नजरा वेधल्या आहेत. सध्या तिचं हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये कंगनाने कृषी कायद्याचे समर्थन केले आहे. या कृषी विधेयकाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं ट्विट कंगनाने केलं. 

ट्विट करत ती म्हणाली, 'अडचण फक्त त्यांची नाही जे त्यांना पाठिंबा देत आहेत आणि कृषी विधेयकाला विरोध करत आहेत. कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तरी देखील लोक आपल्या फायद्यासाठी द्वेष आणि भारत बंद भडकवत आहेत.' तिचं हे ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

दरम्यान तिने अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता दिलजीत दोसांजवर देखील निशाणा साधला आहे. 'प्रिय दिलजीत दोसांज आणि प्रियंका चोप्रा जर खरचं शेतकऱ्यांची चिंता असेल. आपल्या मातांचा आदर-सन्मान करत असाल तर कृषी विधेयक काय आहे ऐका. असं ती म्हणाली. 

शिवाय, मातांचा बहिणींचा, शेतकऱ्यांचा वापर करून तुम्हाला फक्त देशद्रोह्यांच्या गुडबॉक्समध्ये राहायचं आहे? असा प्रश्न उपस्थित करत वाह रे दुनिया वाह असं म्हणाली आहे. देशात सध्या कृषी विधेयकावरून शेतकरी आंदोलन तापलं आहे.