'कंगनाचा जन्मच राणी लक्ष्मीबाईची भूमिका निभावण्यासाठी'

'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा उत्तमच झालाय... या सिनेमामुळे काळाआड गेलेली राणी लक्ष्मीबाई पुन्हा एकदा लोकांच्या समोर येईल

Updated: Jan 24, 2019, 11:07 AM IST
'कंगनाचा जन्मच राणी लक्ष्मीबाईची भूमिका निभावण्यासाठी' title=

मुंबई : नुकताच मुंबईत 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमाची स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील योद्ध्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी बॉलिवूडची अनेक दिग्गज मंडळी उपस्थित झाली होती. यासाठी बॉलिवूडचे 'भारत' अर्थात ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमारही उपस्थित होते. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा पाहिल्यानंतर मनोज कुमार खुपच प्रभावित झालेले दिसले. 

'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा उत्तमच झालाय. या सिनेमामुळे काळाआड गेलेली राणी लक्ष्मीबाई पुन्हा एकदा लोकांच्या समोर येईल. तुम्ही सिनेमात जेव्हा 'हर हर महादेव'ची घोषणा ऐकता तेव्हा तेव्हा कंगना रानौतचा जन्म राणी लक्ष्मीबाईचीच भूमिका निभावण्यासाठी झालाय, याची प्रचिती येते, असं म्हणत मनोज कुमार यांनी बॉलिवूड क्वीनवर कौतुकाची फुलं उधळलीत. 

Karni Sena threatens Kangana Ranaut over 'Manikarnika', says will ruin her career, burn film sets
मणिकर्णिका

कंगनानं राणी लक्ष्मीबाईंची भूमिका केवळ निभावलीच नाही तर तिला पुन्हा एकदा जिवंत केलंय, असंही मनोज कुमार यांनी म्हटलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, कंगना रानौत हिनं 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमासाठी अभनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी कमान सांभाळलीय. कंगनाच्या पुढील वाटचालीसाठी हा सिनेमा खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. 

Manikarnika' producer Kamal Jain suffering from Lung Infection, on his way to recovery
मणिकर्णिका

'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतोय. या सिनेमात कंगना रानौतसोबत अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, जीशू सुरेश ओबेरॉय यांसारखे कलाकाही दिसणार आहेत.