दादासाहेब फाळकेंचा उल्लेख बाबासाहेब केल्याने कंगना ट्रोल

 गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले परखड मत मांडत आहे.

Updated: Sep 15, 2020, 10:06 PM IST
दादासाहेब फाळकेंचा उल्लेख बाबासाहेब केल्याने कंगना ट्रोल  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले परखड मत मांडत आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीपासून ते ड्रग्स कनेक्शन सारख्या वादग्रस्त मुद्द्यावर ते बेधडकपणे वक्तव्य करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारसोबत सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत आहे. दरम्यान सोशल मीडियावर होणाऱ्या टीका आणि आरोपांना प्रत्युत्तर देताना तिच्याकडून मोठी घोडचूक झाली आहे. तिने दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब असा केला आहे. यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. 

ट्विटरवर मनीष अग्रवाल यांनी कंगनावर केलेल्या आरोपांनंतर तिने यावर उत्तर दिले. 'इंडस्ट्री फक्त करण जोहर आणि त्याच्या वडिलांनी निर्माण केली नाही. तर बाबासाहेब फाळकेंपासून ते प्रत्येक कलाकार आणि मजुराने उभी केली आहे.' दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब केल्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. 

कंगना पुढे म्हणाली, ही इंडस्ट्री सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानाने, त्या नेत्याने ज्याने राज्यघटनेची सुरक्षा केली आहे, त्या नागरिकाने ज्याने तिकीट खरेदी करुन प्रेक्षकाची भूमिका बजावली आहे. ही इंडस्ट्री कोट्यावधी भारतीयांनी उभी केली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र सरकार आणि कंगना राणौत वाद चांगलाच पेटला आहे. कंगनाने मुंबई महापालिकेला नोटीस पाठवत मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी महापालिकेकडून २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.  कंगनाच्या याचिकेवर २२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.