मुंबई : सणासुदीच्या निमित्ताने महिला आणि मुलींना सहसा पारंपारिक कपडे घालायला आवडते. आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. याशिवाय देशातील काही भागात पिकांचा सण साजरा केला जात आहे. गुढीपाडवा बरोबरच आज, बैसाखी, उगादीचा सण नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. सर्व ठिकाणचे लोक त्यांच्या परंपरेनुसार उत्सव साजरा करत आहेत.
गुढी पाडव्याच्या दिवशी महिला पारंपारिक दागदागिने आणि साड्या परिधान करतात. या खास प्रसंगी बॉलिवूड अभिनेत्रीही पारंपारिक अवतारात दिसल्या. कंगना रनौत, काजोल, भूमी पेडणेकर मराठमोळ्या अवतारात दिसल्या. पारंपारिक पोशाखात अभिनेत्रींनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत. यासह चाहत्यांनी गुढी पाडवा आणि नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कंगनाचा पारंपारिक लूक
पारंपारिक पोशाखात कंगना रनौत खूप स्टायलिश दिसत आहे. यावेळी कंगनाने हलक्या वजनाची रेशीम साडी परिधान केली. तिने केसात फुलांचे गजरे आणि गळ्यात सोन्याचे दागिन्यांनी आपला लूक सजवला आहे. फोटो शेअर करत कंगनाने चाहत्यांना गुढी पाडवा आणि नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
काजोलचा मराठमोळा लूक
गुढी पाडव्यानिमित्त काजोलने पारंपारिक मराठमोळी साडी परिधान केली. या साडीमध्ये काजोल खूपच सुंदर दिसत होती. तिने सोन्याच्या दागिन्यांसह पारंपारिक नाथ परिधान केली आहे. डोळ्यांना स्मोकी लुक देत काजोलने कपाळावर कुंकवाची मोठी टिकली लावली आहे.
भूमी पेडणेकर तिच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे कायमच चर्चेत असते. गुढी पाडव्यानिमित्त भूमी मराठमोळ्या पारंपारिक साडीमध्ये दिसली. तिने लाल आणि हिरव्या रंगाची बॉर्डर असलेली साडी परिधान केली आहे. भूमीने हलका मेकअप केला आहे. भूमीने ट्रेडिशनल आउटफिट, सोन्याचे दागिने, कपाळावर चंद्रकोर असा भूमीचा आजचा लूक होता.
भूमी पेडणेकर
भूमी पेडणेकर तिच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे कायमच चर्चेत असते. गुढी पाडव्यानिमित्त भूमी मराठमोळ्या पारंपारिक साडीमध्ये दिसली. तिने लाल आणि हिरव्या रंगाची बॉर्डर असलेली साडी परिधान केली आहे. भूमीने हलका मेकअप केला आहे. भूमीने ट्रेडिशनल आउटफिट, सोन्याचे दागिने, कपाळावर चंद्रकोर असा भूमीचा आजचा लूक होता