Kangana Ranaut : यांची पात्रता नाही तरीही... कंगना टोला द्यायला गेली अन् ट्रोल झाली

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या अभिनयासोबतच तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. अशातच सोशल मीडियावर कंगनाने  पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमुळे कंगना ट्रोल होत आहे.

आकाश नेटके | Updated: May 6, 2023, 02:09 PM IST
Kangana Ranaut : यांची पात्रता नाही तरीही... कंगना टोला द्यायला गेली अन् ट्रोल झाली title=

Kangana Ranaut : बॉलिवुडची (bollywood) क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. गेली अनेक वर्षे बॉलिवुडमध्ये कंगना रणौतने  चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका पार पाडल्या आहेत. अभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियावरही (Social Medaia) खूप सक्रिय असते. कंगना रणौत चित्रपटांशिवाय इतरही मुद्द्यांवर सातत्याने भाष्य करत असते. यावरुन सोशल मीडियावर तिला कधी समर्थन दिलं जातं. तर कधी ट्रोल (Kangana Ranaut Troll) केले जाते. अशातच पुन्हा एकदा सोशल मीडियावर अॅक्टिव झाल्यानंतर एक पोस्ट शेअर केली अन् पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली. कंगनाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमुळे ती ट्रोल होत आहे. 

तर अशी आहे कंगनाची पोस्ट

कंगना रणौतने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत कंगनाने गुलाबी रंगाची साडी नेसली असून आजूबाजूला बरीच फुले आहेत. फोटोमध्ये कंगनाने पोज देत 'बाय द वे, सोशल मीडिया माझ्या सौंदर्याला पात्र नाही.... पण, ठिक आहे लक्षात ठेवाल,' असे कॅप्शन दिले आहे.

कंगना रणौतची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच चर्चेत आली आहे. कंगनाच्या चाहत्यांनी तिच्या या लूकचे कौतुक केले आहे. तर कंगनाने तिच्या फोटोवर दिलेल्या कॅप्शनमुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. काहींनी कंगनाच्या कॅप्शनच्या स्टाईलमध्ये कमेंटही केल्या आहेत. तर काही युजर्सनी कंगनाचे वर्णन उर्वशी रौतेलाचे प्रो व्हर्जन म्हणून केले आहे.

सोशल मीडिया क्रॅश होईल मॅडम

तू सुद्धा माझ्या कमेंन्टला पात्र नाहीस

द केरला स्टोरीच्या वादात कंगनाची उडी

'द केरला स्टोरी'वरून सुरू असलेल्या वादावर कंगनाने भाष्य केले आहे. हा चित्रपट पाहिलेला नाही. पण मला वाटते की चित्रपटात आयएसआयएसव्यतिरिक्त कोणाचेही चुकीचे चित्रण केलेले नाही. तरीही लोक या चित्रपटाला विरोध करत असतील तर ते स्वतः दहशतवादी आहेत, असे कंगनाने म्हटलं आहे.