पूनम पांडेच्या निधनानंतर कंगना रणौतला दु:ख अनावर, म्हणाली 'तरुण अभिनेत्रीला...'

पूनम पांडेच्या आकस्मित निधनाने बॉलिवूड कलाकारंसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे. पूनमच्या निधनानंतर अनेक कलाकार हे शोक व्यक्त करत आहेत. 

Updated: Feb 3, 2024, 01:11 PM IST
पूनम पांडेच्या निधनानंतर कंगना रणौतला दु:ख अनावर, म्हणाली 'तरुण अभिनेत्रीला...' title=

Kangana Ranaut On Poonam Pandey Death : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे निधनाच्या बातमीनंतर सर्वांचा धक्का बसला होता. पूनम पांडेच्या टीमकडून तिच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन यासंदर्भात पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पूनम पांडेच्या आकस्मित निधनाने बॉलिवूड कलाकारंसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे. पूनमच्या निधनानंतर अनेक कलाकार हे शोक व्यक्त करत आहेत.

मात्र आता अभिनेत्रीच्या मॅनेजरनेही पूनम पांडेच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता पूनम पांडे जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. तिने स्वतः इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.   

कंगना रणौतलाही बसला धक्का

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने पूनम पांडेच्या निधनाची बातमी पोस्ट केली आहे. यात तिने पूनमला श्रद्धांजली वाहिली आहे. "आपण एका तरुण अभिनेत्रीला कॅन्सरमुळे गमावलं. हे खूप दु:खद आहे. ओम शांती", असे कंगना रणौतने म्हटले आहे. त्याबरोबरच तिने हात जोडण्याचा इमोजीही शेअर केला आहे. कंगनाची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. कंगनाने काही वर्षांपूर्वी लॉक अप हा रिअॅलिटी शो होस्ट केला होता. त्यात पूनम पांडेने सहभाग घेतला होता. 

Kangana Ranaut On Poonam Pandey Death

कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

कंगनासोबत सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे पूनमच्या निधनावर हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. अभिनेता अली गोनीने एक ट्वीट करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे. "पूनमच्या आत्म्यास शांती मिळो", असे अली गोनीने म्हटले आहे. तर अभिनेता करणवीरने "मला अजूनही विश्वास बसत नाही. मी देवाकडे प्रार्थना करतो की ही बातमी खरी नसावी", असे म्हटले आहे. त्यावर त्याने पूनम पांडेचा हॅशटॅगही दिला आहे. 

उत्तर प्रदेशमधील निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान पूनम पांडेचा जन्म 11 मार्च 1991 रोजी कानपूरमध्ये झाला होता. ती एक मॉडेल आणि अभिनेत्री होती. तिने 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती अखेरची 'द जर्नी ऑफ कर्मा' या चित्रपटात दिसली होती. मॉडेल, अभिनेत्री असणारी पूनम पांडे नेहमीच वादग्रस्त राहिली. कधी आपली विधानं तर कधी बोल्ड कपड्यांमुळे ती नेहमीच वादात अडकली. पूनमने 'खतरों के खिलाडी 13' आणि कंगना रणौतच्या 'लॉकअप' या रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती.  पूनम पांडेने उत्तर प्रदेशमधील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. तिच्या मॅनेजरने झूमशी संवाद साधताना तिचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तिच्या पीआर टीमनेही दुजोरा दिला असून लवकरच प्रेस रिलीज जारी करणार असल्याचे सांगितले.