'तो माझ्याकडे प्रेमाची भिक मागायचा' कपूर कुटुंबियाच्या लेकावर कंगनाचा निशाणा

Kangana Ranaut On Ranbir Kapoor and Alia Bhatt: आलिया भट्ट सध्या आपल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्यातून रणबीर कपूरही सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. परंतु यावेळी कंगनानं मात्र त्यांच्यावर भलताच निशाणा साधला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 30, 2023, 08:52 PM IST
'तो माझ्याकडे प्रेमाची भिक मागायचा' कपूर कुटुंबियाच्या लेकावर कंगनाचा निशाणा  title=
July 30, 2023 | kangana ranaut says ranbir kapoor had begged her to date her and calls alia bhatt and his marriage fake

Kangana Ranaut On Ranbir Kapoor and Alia Bhatt: कंगना राणावत हिची अनेक चर्चा रंगलेली असते. सध्याही तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिनं कपूर कुटुंबियांच्या लाडक्या लेकावर निशाणा साधल्याचे दिसून येते आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या इन्टाग्राम पेजवरून तिच्या स्टोरीमध्ये फार मोठ मोठ्या परिच्छेदातले फोटो शेअर करताना दिसते आहे. त्यात ती बॉलिवूडच्या एका लोकप्रिय कपलवर ज्याचे नुकतेच लग्न झाले आहे आणि ज्यांना नुकतीच एक मुलगीही झाली आहे त्यांच्याबद्दल ती लिहिताना दिसते आहे आणि त्यांच्यावर नानातऱ्हेचे आरोप करते आहे. त्यामुळे सध्या कंगनाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. कंगनाचे असे आरोप हे काही कुणाला नवीन नाहीत. त्यातून बॉलिवूडवर तिनं अनेकदा आरोप प्रत्योराप केले असून करण जोहरवरही तिनं अनेकदा टीकास्त्र सोडले आहे. आता तिनं 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटावरूनही तिनं करण जोहरला खडेबोल सुनावलं आहे. 

कंगना ज्यांच्यावर आरोप करते आहे हे कपल दुसरं तिसरं कोणी नसून ते कपल आहे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे. गेल्या काही दिवसांपुर्वी कंगनानं आलिया आणि रणबीर हे दोघं वेगवेगळे राहत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे चर्चांना एकच उधाण आले होते. त्यावेळी तिनं ते दोघं एकाच इमारतीत वेगवेगळ्या मजल्यावर राहत असल्याचा दावा तिनं केला होता. त्यातून हा संदर्भ होता 8 जूलै रोजी इटलीमध्ये नीतू कपूर यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता आणि त्यावेळी मात्र आलिया तिथे उपस्थित नव्हती. त्यामुळे आपण आलियाला आणि आपल्या नातीला खूप मिस करत आहोत असंही नीतू कपूर यांनी पोस्ट केले होते. त्यामुळे कंगनानं त्यावरून टीका केली होती. त्यातून तिनं असेही म्हटले होते की रणबीर कपूर तिलाही डेट करण्यासाठी अनंत मसेज करत होता. परंतु तेव्हाही तिनं त्या दोघांचे नाव लिहिले होते. 

हेही वाचा - बॉलिवूडची क्वीन भक्तीत तल्लीन! घेतलं त्र्यंबकेश्वराचे दर्शन; दोन शब्दात नेटकरी म्हणाले...

आणि आताही तिनं त्यांचे नावं हे लिहिले नसून तिनं हीच री पुन्हा ओढली आहे. यावेळी आलियानं पुन्हा एकदा रणबीर कपूरवर नाही नाही ते आरोप केले आहेत. यात तिनं त्याचा उल्लेख स्त्रीलंपट असा केला असून तो तिच्याकडे प्रेमाची भिक मागायचा असेही तिनं म्हटलं आहे. 

काय म्हणाली आहे कंगना? 

रणबीर कपूरचा Animal हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे तर आलियाचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यातून रणबीरचा सध्या एक रॅम्पवॉकमधला व्हिडीओही चांगलाच चर्चेत आला आहे. कंगनाचेही अनेक चित्रपट हे लाईन्ड अप आहेत.