Kangana Ranaut returns to Twitter: बॉलिवूडची क्वीन म्हणजेच कंगना रानौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' या पॉलिटिकल ड्रामा चित्रपटामुळे (Emergency Movie) चर्चेत आहे. अशातच, कंगना पुन्हा चर्चेत आली ती तिच्या ट्विटर (Kangana Ranaut Twitter) अकाऊंटमुळे. कंगना रानौत वर्षभरानंतर ट्विटरवर परतली आहे. त्यामुळे तिच्या ट्विटरवर फॉलोवर्सची रांग लागल्याचं पहायला मिळतंय. (Kangana Ranaut returns to Twitter after ban is lifted Check out her first tweet latest marathi news)
कंगना आज प्रकाशझोतात येण्याचं कारण म्हणजे तिचे ट्विटर अकाउंट. बंदी उठवल्यानंतर तिने पहिलं ट्विट केलंय. 'सर्वांना नमस्कार, इथे परत आल्याने आनंद झाला', असं कंगना म्हणाली आहे. त्यामुळे तिने स्मिथ हास्यवाली स्माईली देखील पाठवली आहे.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 24, 2023
बंगाल निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात अभिनेत्रीने वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यानंतर तिला ट्विटरने बॅन केलं होतं. याशिवाय कंगना रानौतवर सतत ट्विटरच्या धोरणांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. कंगनाने केलेले अपमानास्पद ट्विट हे ट्विटरच्या धोरणाला हानी पोहोचवत असल्याचा आरोप झाल्यानंतर ट्विटरने कंगनाचा गाशा गुंडाळला होता.
आणखी वाचा - Jaya Bachchan यांनी कंगनाला पाहून फिरवली पाठ, पण अभिषेकने मारली मिठी
दरम्यान, कंगना पुन्हा ट्विटरवर परतल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी आत्तापासूनच तिला ट्रोल करण्यास सुरूवात केलीये. कंगनाच्या इमर्जन्सी सिनेमा रिलीज होण्याआधी कंगना ट्विटरवर अॅक्टिव होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा वाद देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.