'तो महिलांचा फायदा...', कंगना रणौतची जॉन अब्राहमबद्दलची पोस्ट चर्चेत

Kangana Ranaut on John Abraham : कंगना रणौत ही सोशल मीडियावर नेहमीच अनेकांना ट्रोल करतान दिसते, आता मात्र, तिनं चक्क एका अभिनेत्याचे कौतुक केले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 15, 2023, 02:04 PM IST
'तो महिलांचा फायदा...', कंगना रणौतची जॉन अब्राहमबद्दलची पोस्ट चर्चेत title=
(Photo Credit : Social Media)

Kangana Ranaut on John Abraham : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. कधी तिच्या काही पोस्ट तर कधी तिचे चित्रपट... कंगणा ही तिचं परखड मत मांडताना दिसते. नेहमीच बॉलिवूडवर टीका करणारी कंगना कधी कोणाविषयी काही चांगल बोलेल याची अपेक्षा कोणी केली नव्हती. मात्र, आता कंगनानं कोणाला ट्रोल केलं नसून थेट एका अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. कंगनानं बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचं कौतुक केलं आहे.  

कंगना रणौतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनानं जॉन अब्राहमचं तोंड भरून कौतुक केलं आहे. यावेळी कंगनानं जॉन अब्राहमचा एक फोटो शेअर केला आहे. यावेळी कंगना म्हणाली, 'आजवर चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांविषयी मी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण ज्या गोष्टी प्रेरणादायी आणि सज्जन आहेत त्यांना विसरून चालणार नाही. मी जॉन अब्रामविषयी बोलते. त्याच्यासोबत मी काम केलंय. तो किती उत्तम अभिनेता आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. जॉनविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. कारण जॉन कधीच स्वतःचं कौतुक करण्यासाठी माध्यमांना पैसे देत नाही. जॉन हा अत्यंत दयाळू आहे.' 

Kangana Ranaut for the first time not complaining about any actor but Praises one of her co strar

कंगना पुढे जॉनविषयी बोलताना म्हणाली की ' त्याच्या खासगी आयुष्याविषयी लग्नाविषयी, रिलेशनशिपविषयी कधीच कोणती पीआर नाही, जॉन पैसे देऊन दुसऱ्यांबद्दल नकारात्मक वातावरण तयार करत नाही. तो महिलांचा फायदा उचलत नाही.तो कोणाला त्रास देत नाही. तो एक माणूस म्हणून खूप चांगला आहे… लव्ह यू जॉन…’

हेही वाचा : अक्षयनं कॅनडाचं नागरिकत्व सोडलं... झाला भारतीय नागरिक... स्वातंत्र्य दिनी केली घोषणा

कंगना इथेच थांबली नाही तर तिनं आणखी एक उदाहरण देत सांगितलं की 'एक एजंट आहे, जो चित्रपटसृष्टीतील जवळपास सगळ्याच कलाकारांना घरकामासाठी माणसं पाठवतो. त्यानं एकदा मला सांगितलं होतं की मॅनजरचं म्हणनं आहे की त्यांचे सगळे घरात काम करणारी माणसं आणि ड्रायव्हरसोबत चित्रपटसृष्टीतील लोक खूप वाईट वागतात. आमच्या पूर्ण करिअरमध्ये त्यांना फक्त दोन व्यक्ती भेटले जे त्यांच्या घरात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कुटुंबासारखं ठेवतात पहिला जॉन अब्राहम आणि दुसरी कंगना रणौत.' 

कंगनाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच इमर्जन्सी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना रणौत ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनासोबत या चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे या कलाकारांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. तर काही दिवसांपूर्वी ती 'चंद्रमुखी 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्या चित्रपटातील तिचा पहिला लूक समोर आला होता. त्यावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.