मुंबई : फॅशन डिझायनर आनंद भूषण(Anand Bhushan) आणि रिमजिम दादू(Rimzim Dadu)यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यापुढे अभिनेत्री कंगना रानौतसोबत काम करणान नाही असं जाहीर केलं आहे. शिवाय त्यांनी कंगनासोबतचे सर्व अपकमिंग प्रोजेक्ट सुद्धा बॅन केले आहेत. एवढंच नाही तर त्यांनी कंगनासोबत यापुर्वी केलेल्या कामाचे फोटोस देखील सोशल मीडियावरून डिलिट करत असल्याचं सांगितलं आहे.
आनंद ट्विट करत म्हणला, 'आज काही घटना पाहिल्यानंतर कंगनासोबत केलेल्या कामाचे फोटो हटवण्याचा निर्णय घेत आहोत. त्याचप्रामाणे यापुढे कंगनासोबत काम न करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.' त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत कंगनाच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Do the right thing. pic.twitter.com/p72a7zqFz9
— Anand Bhushan (@AnandBhushan) May 4, 2021
तर दुसरीकडे रिमजिम दादूने देखील कंगनासोबत काम करण्यास नकार दिला आहे. काही निर्णय घ्यायला उशिर होतो. त्यापैकी हा एक निर्णय आहे. असं रिमजिमने म्हटलं आहे. यामध्ये अभिनेत्री स्वरा भास्करने उडी घेतली आहे. तिने दोघ्यांच्या ट्विट आणि इन्स्टाग्राम पोस्टचे स्क्रिनशॉट काढले आहेत.
Pleasantly surprised to see this! Kudos to you @AnandBhushan & #RimzimDadu for calling out hate speech and incitement to genocide in a direct manner! Stand tall you guys! pic.twitter.com/G1Gd82bbmL
— Swara Bhasker (@ReallySwara) May 4, 2021
ते स्क्रिनशॉट स्वराने तिच्या सोशल मीडिया आकाउंटवर पोस्ट केले आहेत. स्क्रिनशॉट पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'हे सर्व पाहून अत्यंत चांगलं वाटतं आहे. तुमच्या दोघांचं कौतुक करायला हवं...' असं लिहिलं आहे.
कंगना रानौतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असणाऱ्या कंगनावर ट्विटरचे नियम फॉलो न करण्याचे आरोप लावण्यात आला आहे. अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर ट्विटरवर #KanganaRanaut हा हॅशटॅग ट्रेंड झाला.