मुंबईः कंगना राणावतने नुकताच तिचा इंदिरा गांधींच्या भुमिकेतला लुक रिविल केला आहे तेव्हा आता या लुकमुळे सर्वत्र कंगनाचीच चर्चा आहे. त्यातून नुकत्याच आलेल्या 'एमर्जन्सी' या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे तर कंगनाच्या अभिनयावर कौतुकांचा वर्षाव होतो आहे एवढेच नसून 'द क्वीन इझ बॅक' म्हणत कंगनाच्या या नव्या धाडसाचे कौतुकही केले आहे.
कंगनाने 'इमर्जन्सी' या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. 'इमर्जन्सी' या चित्रपटापुर्वी कंगनाने 'थलायवी' या चित्रपटातून जयललिता यांची भुमिका निभावली होती. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची प्रमुख भूमिका तिने या चित्रपटातून साकारली होती. नुकत्याच आलेल्या एका मुलाखतीत कंगनाने आपण इंदिरा गांधींच्या भुमिकेसाठी योग्य असल्याचा दावा केला आहे.
एका मुलाखतीदरम्यान बोलताना कंगनाने आपल्या मेकअप आर्टिस्ट डेव्हिड मालिनोव्स्कीबद्दल बोलताना त्याचे कौतुक केले आहे. त्यावर बोलताना कंगना म्हणाली, ''डेव्हिड आणि त्याची टीम खूपच प्रोफेशनल आहे. आम्ही फायनल लूक चेक करण्यासाठी खूप लुक टेस्ट केल्या. अनेकवेळा लुकही बदलून पाहिला. डेव्हिडने माझ्या लुकवर खुपच मेहनत घेतली आहे. त्याच्या आर्टवर बोलायला शब्दच कमी पडतात. खरंतर त्याने माझ्या निर्दशनास आणून दिले की मी इंदिरा गांधी यांच्या लुकसाठी किती योग्य आहे ते. स्कीन टेक्शचरपासून ते हेअरस्टाईलपर्यंत माझा लुक त्याने फिट बसवला आहे. देशात लोकांचा विश्वास बसला आहे की मी इंदिरा गांधीच्या लुकसाठी योग्य आहे.''
'वर्ल्ड वॉर झेड' (2013) आणि 'द बॅटमॅन' (2022) सारख्या लोकप्रिय हॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, डेव्हिड मालिनोव्स्कीने 2017 च्या 'डार्केस्ट एवर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशरचनासाठी ऑस्करसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
कंगना नुकतीच 'धाकड' चित्रपटातून दिसली. सर्वेश मेवारा दिग्दर्शित 'तेजस' चित्रपटात ती भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत टिकू वेड्स शेरू या चित्रपटातून कंगना निर्माती म्हणूनही पदार्पण करणार आहे.