Kalki Box Office: शाहरुखचा सर्वात मोठा विक्रम धोक्यात, कल्की चित्रपटाची 600 कोटींकडे वाटचाल

कल्की चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. सध्या कल्कीवर नोटांचा पाऊस पडत आहे. कल्की 2898 AD वेगाने पुढे जात आहे. यामुळे शाहरुख खानच्या करिअरचा सर्वात मोठा विक्रम धोक्यात येणार आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jul 19, 2024, 05:59 PM IST
Kalki Box Office: शाहरुखचा सर्वात मोठा विक्रम धोक्यात, कल्की चित्रपटाची 600 कोटींकडे वाटचाल title=

Kalki Box Office: प्रभासच्या कल्की 2898 AD रिलीज होऊन 3 आठवडे झाले आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कल्कीचे कलेक्शन दररोज वाढत आहे. 3 आठवडे उलटूनही लोकांमध्ये बाहुबली सुपरस्टार प्रभासची क्रेझ बघायला मिळत आहे.  त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने देखील चाहते प्रभावित झाले आहेत. चित्रपटाचे कलेक्शन 600 कोटींकडे गेलं आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या करिअरचा सर्वात मोठा विक्रम धोक्यात येणार असल्याची चर्चा होत आहे. 

कल्कि चित्रपट त्याच्या अनोख्या संकल्पनेमुळे चर्चेत राहिला आहे. हा चित्रपट एक विज्ञानकथा पौराणिक भविष्यवादी चित्रपट आहे. चित्रपट चर्चेत राहण्याची अनेक कारणे आहेत. ज्यामध्ये अमिताभ बच्चन  यांनी अश्वत्थामाच्या भूमिकेत चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर गरोदरपणात दीपिका पदुकोणच्या अभिनयानेही लोकांची मने जिंकली आहेत. 

'कल्की 2898 AD' चित्रपट चर्चेत

 प्रभासच्या 'बाहुबली' चित्रपटानंतर कल्की चित्रपटाने त्याच्या कारकिर्दीला चालना दिली आहे. त्याचवेळी अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांनी आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, वयाच्या या टप्प्यावरही त्यांची ताकद आणि जोश कमी झालेला नाही. 'कल्की' चित्रपटाबाबत अनेक कारणे आहेत, ज्यामुळे तो पाहण्यासारखा आहे. 

3 आठवड्यात किती कमाई? 

कल्की चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 70 टक्के कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात तब्बल 414.85 कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली आहे. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 128.85 कोटींची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात 55.85 कोटींची कमाई केली. कल्की चित्रपटाचे 22 दिवसांचे कलेक्शन 599.20 कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी हा चित्रपट 600 कोटींचा टप्पा सहज पार करेल. 

कल्की शाहरुखच्या चित्रपटाचा विक्रम मोडू शकेल का? 

कल्कीने 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यानंतर सर्वांचं लक्ष शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट जवान आहे. या चित्रपटाने भारतातील सर्व भाषांमध्ये 640.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे जर आता कल्की चित्रपटाने या आठवड्यात चांगली कमाई केली तर शाहरुख खानच्या जवानला कल्की चित्रपट कलेक्शनमध्ये मागे टाकू शकतो.