वयाच्या 9 व्या वर्षी कल्कीचं लैंगिक शोषण; आता 'त्या' प्रसंगाला फुटली वाचा 

अभिनेत्री कल्की केक्ला आज तिचा ३८वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे.

Updated: Jan 10, 2022, 01:44 PM IST
वयाच्या 9 व्या वर्षी कल्कीचं लैंगिक शोषण; आता 'त्या' प्रसंगाला फुटली वाचा  title=

मुंबई : आपल्या परीने आयुष्य जगणारी बॉलिवूडची बिंधास्त अभिनेत्री कल्की केक्ला आज तिचा ३८वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि वेगवेगळ्या पात्रांनी लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणाऱ्या कल्कीचा जन्म 10 जानेवारी 1984 रोजी झाला. कल्कीचे आई-वडील मूळचे फ्रेंच आहेत.

तिचे वडील एयरक्राफ्ट कारखाना चालवतात, तर अभिनेत्रीचे आजोबा आयफेल टॉवर आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे मुख्य अभियंता होते. कल्कीचे बालपण पॉन्डिचेरी तसंच तमिळनाडूतील उटीमध्ये गेलं. फ्रेंच व्यतिरिक्त कल्कीचं हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषांवर चांगलं प्रभुत्व आहे.

कल्कीची चित्रपट कारकीर्द
2009 मध्ये 'देव डी' चित्रपटातून कल्कीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केलं होतं. कल्कीचा चेहरा भारतीय नसल्यामुळे चित्रपटासाठी ती पहिली पसंती नव्हती. असं म्हटलं जातं. पण जेव्हा अनुरागने तिची ऑडिशन पाहिली तेव्हा त्याने आपला विचार बदलला.
 
या चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. कल्कीला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. यानंतर तिने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'ये जवानी है दिवानी', 'जिया और जिया', 'गली बॉय' सारख्या चित्रपटात काम केलं. 'गोल्डफिश' असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे.

अनुराग कश्यपच्या प्रेमात
कल्कीने 30 एप्रिल 2011 रोजी 'देव डी'चे दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न केलं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं जवळ आले. त्यावेळी ती अनुरागच्या खूप प्रेमात होती. पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. दोन वर्षांतच दोघं वेगळे झाले. अनुरागचं हे दुसरं आणि कल्कीचं पहिलं लग्न होतं. घटस्फोटानंतरही दोघेही चांगले मित्र आहेत.

लग्नाआधी बनली होती आई
अनुरागपासून घटस्फोट घेतल्यानंतर कल्कीने गाय हर्शबर्गला डेट करायला सुरुवात केली. यावेळीही अभिनेत्री त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. कल्कीचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग हा इस्रायलचा असून तो आर्टिस्ट आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये कल्कीने लग्न न करता मुलाला जन्म दिला. अनेकदा ती आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

वयाच्या 9व्या वर्षी झालं लैंगिक शोषण
कल्कीने तिच्य एका मुलाखतीत खुलासा केला होता की, वयाच्या ९व्या वर्षी तिचं लैंगिक शोषण झालं होतं. तिने आपल्या घरातील सदस्यांना याचा उल्लेख केला नाही.एक अभिनेत्री असण्यासोबतच ती एक लेखिका देखील आहे. तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला लहानपणापासूनच कविता लिहिण्याची आणि पाठ करण्याची आवड होती. लवकरच तिचं एक पुस्तक येणार आहे.