Jhanak Shukla : शाहरुख खानसोबत रुपेरी पडद्यावर झळकलेली 'ही' एक्ट्रेस झाली इंगगेड ! साखरपुड्याचे फोटो व्हायरल...

Karishma Ka Karishma Fame अभिनेत्रीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत हा खुलासा केला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Updated: Jan 9, 2023, 07:16 PM IST
Jhanak Shukla : शाहरुख खानसोबत रुपेरी पडद्यावर झळकलेली 'ही' एक्ट्रेस झाली इंगगेड ! साखरपुड्याचे फोटो व्हायरल... title=

Karishma Ka Karishma Jhanak Shukla :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) लोकप्रिय ठरलेला 'कल हो ना हो' (Kal Ho Na Ho) या चित्रपटात जिया (Jiya) ही भूमिका अभिनेत्री झनक शुक्लानं (Jhanak Shukla) साकारली होती. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटातील जिया ही 26 वर्षांची आहे. झनक शुक्लाचा नुकताच साखरपुडा झाला आहे. झनक शुक्लाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव स्वप्निल सूर्यवंशी आहे. झनकनं तिच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. 

झनकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. झनकनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती आणि स्वप्नील हे सोफ्टावर बसल्याचे दिसत आहे. फोटोत दोघेही एकमेकांकडे बघत असल्याचे दिसत आहे. झनकनं यावेळी गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि त्यासोबतच पिवळ्या रंगाचा दुपट्टा घेतला आहे. स्वप्नीलनं जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला आहे. झनकनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये साखरपुड्या दरम्यान, देण्यात आलेल्या वस्तू दिसत आहेत. झनक आणि स्वप्नील गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. तर आता झनक आणि स्वप्नीलनं त्यांच्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'चित्रा वाघ माझी सासू...', असं म्हणत Urfi Javed नं उडवली खिल्ली

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

झनकनं हा फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे की, शेवटी आम्ही हे अधिकृतपणे घोषित केलं. यासोबत तिनं हार्ट इमोजी वापरले आहेत. झनक शुक्ला ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सुप्रिया शुक्ला (Supriya Shukla) यांची मुलगी आहे. झनक ही गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. तर सुप्रिया या अजूनही टीव्ही आणि वेब सीरिजमध्ये सक्रिय आहेत. झनकच्या आईनं तिच्या फोटोवर कमेंट करत 'नेहमी आनंदी राहा, दोघांसाठी खूप खूप प्रेम ', असे म्हटले आहे.  झनकच्या फोटोवर कमेंट करत अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यात अभिनेत्री अविका गौर देखील आहे. अविका गौरनं कमेंट करत अभिनंदन असे म्हटले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

झनक शुक्ला 26 वर्षांपासून चित्रपट आणि छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी ओळखली जाते. झनकनं 'करिश्मा का करिश्मा' (Karishma Ka Karishma) या मालिकेत रोबोटिक गर्ल करिश्माची भूमिकाही साकारली होती. झनकचे हे पात्र आजही प्रेश्रकांच्या लक्षात राहिले आहे.  याशिवाय झनकनं 'वन नाइट विथ किंग' या हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. झनक तिच्या काळात खूप लोकप्रिय होती. दरम्यान, झनकनं वयाच्या 15 व्या वर्षी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य होते.