दीपिका, प्रियंका पाठोपाठ 'ही' अभिनेत्री हॉलिवूडच्या वाटेवर ?

बॉलिवूडमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादूकोण यांनी हॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे.  प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये टेलिव्हिजन सीरिज आणि काही चित्रपटामध्ये झळकली आहे. 

Updated: Jun 13, 2018, 08:26 AM IST
दीपिका, प्रियंका पाठोपाठ  'ही' अभिनेत्री हॉलिवूडच्या वाटेवर ?  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादूकोण यांनी हॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे.  प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये टेलिव्हिजन सीरिज आणि काही चित्रपटामध्ये झळकली आहे. 

काजोलला हॉलिवूडची भूरळ  

प्रियांका, दीपिका पाठोपाठ आता काजोललादेखील हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा आहे. काजोलने नुकतेच डिस्नी पिक्सरच्या 'इनक्रेडिबल्स 2'च्या हिंदी व्हार्जनसाठी डबिंग केले आहे. यावेळेस बोलताना काजोल म्हणाली, " मला हॉलिवूडमध्ये काम करण्याची, येथील संधी तपासून पहायला आवडतील. हिंदीप्रमाणेच चित्रपटाची पटकथा पाहूनच त्याची निवड करणार असल्याची भावना व्यक्त केली आहे."  

व्हिआयपी 2 अखेरचा सिनेमा 

संसारात रमल्यानंतर काजोल सिनेमापासून दूर गेली होती. काजोल काही निवडक चित्रपटातून रसिकांच्या भेटीला आहे. दरम्यान काजोलने केलेला शेवटचा चित्रपट म्हणजे व्हिआयपी 2.  या चित्रपटात काजोलसोबत धनुष होता. या चित्रपटामध्ये काजोल नकारात्मक भूमिकेत होती. यानंतर काजोल हॉलिवूडचा अ‍ॅनिमेशनपट 'इनक्रेडिबल्स 2' मध्ये सहभागी झाली आहे.