स्वत:चा न्यूड फोटो पाहून घाबरली अभिनेत्री काजल; तुम्हालाही बसेल धक्का

स्वत:चा न्यूड फोटो पाहून अभिनेत्रीला धक्का बसला आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Updated: Feb 18, 2023, 08:53 PM IST
स्वत:चा न्यूड फोटो पाहून घाबरली अभिनेत्री काजल; तुम्हालाही बसेल धक्का title=

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंत आपली छाप सोडणारी अभिनेत्री काजल अग्रवालचा मोठा चाहता वर्ग आहे. काजल अग्रवालने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र यादरम्यान अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होते. जे पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

न्यूड फोटोशूट व्हायरल
काजल अग्रवालचे न्यूड फोटोशूट 2011 मध्ये व्हायरल झाले होते. हा फोटो इंडियाज मेन्स ग्लॉसी मॅगझिनने आपल्या कव्हर पेजवर प्रकाशित केला आहे. हा फोटो समोर आल्यापासून काजल अग्रवालचे चाहते चांगलेच संतापले होते.

या फोटोशूटबद्दल सांगायचे तर, या फोटोशूटमध्ये ती पूर्णपणे न्यूड दिसत होती. अंगावर एकही कपडा तिने घातला नव्हता. तिने आपलं शरीर आपल्या हातांनी झाकल्याचं या फोटोत दिसत. तिचा असा फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, तर स्वतः अभिनेत्रीलाही धक्का बसला.

मुलाखतीत सांगितलं सत्य 
एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने मासिकावर अनेक आरोपही केले होते. काजल अग्रवालने सांगितलं की, तिने असं फोटोशूट कधीच केलं नाही. यासोबतच काजल अग्रवाल पुढे म्हणाली की, 'शूट दरम्यान घातलेले कपडे फोटोशॉपच्या मदतीने काढण्यात आले होते'.

मॅगझिनने फोटो एडिटिंग केलं
काजल अग्रवाल म्हणाली की, 'तिच्या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे'. कारण तिने असं कोणतेही फोटोशूट केलं नाही'. हे प्रकरण इथेच थांबले नाही, मासिकाच्या संपादकाने पुष्टी केली की, 'अभिनेत्री काजल अग्रवाल खोटं बोलत आहे, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे, एवढंच नव्हेतर ते पुढे म्हणाले की, यावर काजलची स्वाक्षरी आहे. आमच्याकडे फॉर्म देखील आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर काजोल चांगली चर्चेत आली होती.