'कच्चा बदाम' फेम भुवन आता असं आयुष्य जगतोय ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल

जाणून घ्या आता काय करतोय 'कच्चा बदाम' फेम भुवन

Updated: Nov 3, 2022, 10:53 AM IST
'कच्चा बदाम' फेम भुवन आता असं आयुष्य जगतोय ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी 'कच्चा बदाम' हे गाणं चांगलच ट्रेंड झालं होत. या गाण्यामुळे भुवन बड्याकर रातोरात स्टार झाला होता. खरंतर या गाण्यामुळे अंजली अरोराला लोकप्रियता मिळाली होती. आता भुवन बड्याकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भुवन आता वेगवेगळी गाणी बनवत लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, भुवन आता कोणतं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, याविषयी त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

भुवन बड्याकर (Bhuvan Badyakar) शेंगदाणे विकण्याच्या स्टाईलनं त्याला लोकप्रिय बनवलं. मे महिन्यात कार अपघातानंतर भुवन बेपत्ता झाला. आता भुवन एक नवीन अल्बम प्रदर्शित करणार आहे. त्याच्या म्हणण्यानुसार अल्बममध्ये तीन गाणी असणार आहेत. ही तिन्ही गाणी त्यांच्या आयुष्याच्या प्रवासावर आधारित आहे. 
 
'आज तक' ला दिलेल्या मुलाखतीत भुवन बडईकर म्हणाला, 'अब मैं मूंगफली नहीं बेचूंगा' हे माझ्या अल्बमचं नाव आहे, या अल्बममध्ये  मला लोकप्रियता मिळण्याआधीची माझी कहाणी आहे. तो पुढे म्हणाला की असं नाही की तो पुढे हे काम करणार नाही, पण त्याच्याकडे ते काम करण्यासाठी वेळ नाही. आता त्याला आयुष्य जगायचे आहे. (Kacha Badam Fame Bhuvan Badyakar Is Now Coming Back With New Album Know Detail) 

भुवन म्हणाला की त्याच्याकडे आता कार आहे. त्याच आयुष्य त्याच्या अवजीभोवती फिरतं. आता त्याला त्याचं आयुष्य यासोबत दाखवायचे आहे. भूवन पुढे म्हणाला, तो स्वत: ला भाग्यवान समजतो की लोकांना आता त्याची गाणी ऐकायची आहेत. 'कच्चा बदाम' गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांना त्याच्यासोबत काम करायचे आहे. 

दरम्यान, भुवन सध्या 'जत्रा' नावाच्या थिएटर ग्रुपसोबत काम करतोय. भुवनं बंगालमध्ये अनेक ठिकाणी टूर केली आहे. दुर्गापूजेच्या वेळी त्यानं त्याच्या आगामी गाण्यांवर काम सुरु केलं आणि आता तो फक्त गाणी प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.