Photo : 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील 'छोटी करीना' गुपचूप अडकली लग्नबंधनात

Kabhi Khushi Kabhie Gham :  'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील अभिनेत्री मालविका गुपचूप अडकली लग्नबंधनात..  फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

दिक्षा पाटील | Updated: Dec 1, 2023, 05:30 PM IST
Photo : 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील 'छोटी करीना' गुपचूप अडकली लग्नबंधनात  title=
(Photo Credit : Social Media)

Kabhi Khushi Kabhie Gham : बॉलिवूडमधील असे काही ठरावीक चित्रपट आहेत जे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून गेलेत. त्यापैकीच एक चित्रपट हा 2001 मध्ये प्रदर्शित झालेला 'कभी खुशी कभी गम'. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आहेत. आजही त्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात आहेत. फक्त अमिताभ, शाहरुख आणि जया बच्चन नाही तर बालकलाकारांनी देखील प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटातील पू ही भूमिका तर चांगलीच गाजली होती. करीना कपूरनं ही भूमिका साकारली होती. मात्र, तिच्या बालपणीची भूमिका ही अभिनेत्री मालविका राजनं साकारली होती. आता मालविकाही 30 वर्षांती झाली असून तिनं गपचूप लग्न केलं आहे. तिच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.   

मालविकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती तिचा नवऱ्यासोबत दिसत आहे. तिच्या नवरा हा बिझनेसमन असून त्याचं नाव प्रणव बग्गा आहे. त्या दोघांनी लग्नातील कपड्यांसाठी पिवळ्या रंगाला पसंती दिली आहे. त्याशिवाय त्यांच्या मागे सुंदर बॅकग्राऊंड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हे फोटो शेअर करत मालविकानं आमचं हृदय हे प्रेमानं भरलेलं आहे. ती एक स्टायलिश आणि आतापर्यंतच्या सगळ्यात वेगळ्या आणि हटके नवऱ्यांपैकी दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मालविका आणि प्रणवनं त्यांच्या लग्नात असा वेगळाच कधीही कोणी लग्नात न वापरलेला रंग वापरला आहे. त्यावरून काहींनी प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटलं की 'तुम्ही दोघांनी लग्नासाठी हटके रंग वापरला आहे. मुळात हे खूप चांगलं दिसतंय. तुम्ही दोघेही सुंदर दिसत आहेत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'खूप वेगळे आणि सुंदर दिसत आहात. मला लेहेंग्याचा रंग आवडला.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तुझ्यासाठी खूप आनंदी आहे.' 

हेही वाचा : Sam Bahadur Twitter Review: 'सॅम मानेकशॉ' यांच्या भूमिकेत विकी कौशलनं जिंकली प्रेक्षकांची मने, आनंद महिंद्रा म्हणाले...

सध्या सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा सुरु आहे. त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत असून सोबतच गोड शुभेच्छा देखील देत आहेत.  'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन आणि करीना कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.