कमाल! Jr NTR चं हिंदी ऐकून भलेभले थक्क; तुम्ही पाहिला का Viral Video

येत्या काळात हा साऊथ सुपरस्टार... 

Updated: Dec 23, 2021, 12:05 PM IST
कमाल! Jr NTR चं हिंदी ऐकून भलेभले थक्क; तुम्ही पाहिला का Viral Video  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दाक्षिणात्य कलाविश्वामध्ये कलाकारांना प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळतं. अशा कलाकारांच्या यादीत अभिनेका ज्युनिअर एनटीआर याच्या नावाचाही समावेश आहे. गेल्या दोन दशकांपासून त्यानं तेलुगू चित्रपटसृष्टी खऱ्या अर्थानं गाजवलीये. 

फक्त दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्येच नव्हे, तर विविधभाषी प्रेक्षकांच्या मनावर एनटीआरच्या अभिनयानं कायमची भुरळ पाडली आहे. 

बऱ्याच चित्रपटांसाठी त्यानं डबिंगही केलं आहे. त्यामुळं ज्युनिअर एनटीआरकडे एक हरहुन्नरी अभिनेता म्हणूनही पाहिलं जातं. 

आता मुद्दा असा, की दक्षिणेकडे गेल्यावर अनेकदा हिंदी भाषेचा वापर फार कमी होत जातो. मुळात अनेकांना हिंदी भाषा फारशी कळतही नाही. 

हा अभिनेता मात्र या साऱ्याला अपवाद ठरत आहे. हे सिद्ध करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

RRR या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमाच्या वेळी ज्यु. एनटीआर व्यासपीठावर बसला होता. 

तिथेच त्याला असा एक प्रश्न विचारला गेला, ज्याचं उत्तर त्यानं हिंदीमध्ये देण्यास सुरुवात केली. 

उत्तर देताना त्यानं अगदी अस्खलित हिंदी बोलत सर्वांनाच गारद केलं. त्याच्या शेजारी बसलेल्या अजय देवगन याच्या चेहऱ्यावरही यावेळी स्मितहास्य पाहायला मिळालं होतं. 

हा व्हि़डीओ आणि अभिनेत्याचा हिंदी भाषा बोलण्याचा अंदाज सर्वांच्या मनाचा ठाव घेऊन गेला.