ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची पहिली झलक; हॉलिवूडचे बिग बजेटही पडतील फिके

Jr NTR Devara Part 1 : ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची धमाकेदार पहिली झलक प्रदर्शित... 

दिक्षा पाटील | Updated: Jan 8, 2024, 06:33 PM IST
ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची पहिली झलक; हॉलिवूडचे बिग बजेटही पडतील फिके title=
(Photo Credit : Social Media)

Jr NTR Devara Part 1 : दाक्षिणात्य अभिनेता एनटीआर त्याच्या आगामी अ‍ॅक्शन ड्रामा 'देवरा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातून त्याचा एक वेगळा अवतार पाहायला मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात जान्हवी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सैफ अली खान देखील आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

देशभरातील चाहते आणि प्रेक्षक 'देवरा'चं विश्व पाहण्यासाठी आतुरतेनं वाट पाहत होते. 'देवरा' या जगाची ओळख करून देणारी झलक आज प्रदर्शित झाली आहे. या व्हिडिओत समुद्र, जहाजे आणि रक्तपाताने भरलेल्या जगाची ओळख करून देण्यात आली आहे. NTR एका वेगळ्या आणि शक्तिशाली अवतारात दिसतोय. या व्हिडीओच्या सुरुवातीला पाहताना असं वाटतं की हा कोणता हॉलिवूड चित्रपट आहे. मात्र, अखेरीस लक्षात येत की हा तर आपला भारतीय चित्रपट आहे. सगळ्यात लक्ष वेधी जो सीन आहे तो म्हणजे एका ठिकाणी एनटीआर त्याच्या हातात असलेलं अस्त्र फिरवतो आणि एक गोल आकार तयार होतो. शेवटी तो लाल समुद्र का आहे याविषयी त्यानं सांगितलं आहे. या व्हिडीओच्या शेवटी असं जाणवतं की समुद्रात मासे कमी आणि रक्त जास्त आहे.   या चित्रपटातील प्रभावी डायलॉग्सनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

हेही वाचा : कपूर कुटुंबासोबत एकाच टेबलवर का जेवतात तैमूर आणि जेहच्या नॅनी?  
 
या चित्रपटासाठी VFX टीमनं अप्रतिम काम केल्याचं आपल्या संपूर्ण व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असून सैफ अली खानची देखील महत्त्वाची भूमिका आहे. या दोघांशिवाय प्रकाश राज, श्रीकांत मेका, टॉम शाइन चाको, नारायण यांच्या देखील भूमिका आहेत. 'देवरा' हा नंदामुरी कल्याण राम यांनी सादर केलेला बहुप्रतिक्षित चित्रपट असून तो एनटीआर आर्ट्स आणि युवासुधा आर्ट्सच्या बॅनरखाली बनवला गेला आहे. मिक्किलीनेनी हे सुधाकर आणि हरी कृष्णाचे निर्माते आहेत. तर हा चित्रपट संगीतबद्ध करण्याचं काम संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. चित्रपट निर्माते कोरतला सिवा दिग्दर्शित हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग, 'देवरा भाग 1' जगभरात 5 एप्रिल 2024 रोजी तेलगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होईल.