नवी दिल्ली : आयुष्याच्या प्रवासावर निघालेल्या प्रत्येकालाच अनेक टप्प्यांतून जावं लागतं. अनेकदा आयुष्यात सगळंच सुख मिळतं असं नाही. पण, आपल्या वाट्याला जे आहे त्यातच आनंद मानत बेभान जगता आलं पाहिजे.
काही व्यक्ती असाच संदेश आपल्या वागण्यातून आणि जण्यातून देत असतात.
सध्या याचसंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जिथं मला हे हवं, हीच नोकरी हवी, अमुक प्रकारचंच जगणं हवं अशी कोणतीही अपेक्षा न ठेवता आहे त्या सुरक्षा रक्षकाच्या अर्थात सिक्युरिटी गार्डच्या नोकरीतच आनंदी असणारा एक व्यक्ती दिसत आहे.
दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत असणाऱ्या एका व्यक्तीनं 'जुली जुली' या गाण्यावर असा काही ठेका धरला, की पाहणारे ही थक्कच झाले.
सहसा सुरेखपणे ठेका धरणाऱ्या व्यक्तीला पाहिलं की नकळतच आपलेही पाय थिरकू लागतात.
सिक्युरिटी गार्डचा डान्स पाहूनही असंच वाटत आहे. त्याच्या या 'जुली डान्स' व्हिडीओला अनेक लाईक्स मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात तो व्हायरलही होत आहे.
The Art of an artist never dies!!!!....
Dance of JNU security guard ji.... #artist #JNU @JNU_Photos @ndtv @ScoopWhoop @TheLallantop pic.twitter.com/fUrrzYMCZl
— JNU ROUND TABLE (@Jnuroundtable) December 7, 2021
सराईत डान्सर एकिकडे आणि या व्हिडीओतील गार्ड एकिक़डे अशीच काहीशी प्रतिक्रिा नेटकऱ्यांनी दिली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं?