Jhund साठी अमिताभ यांना जेव्हा पहिल्यांदा भेटले नागराज मंजुळे, पाहा काय म्हणाले होते बीग बी?

नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उत्सूकता होती. अमिताभ बच्चन यांची या सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे.

Updated: Mar 4, 2022, 03:39 PM IST
Jhund साठी अमिताभ यांना जेव्हा पहिल्यांदा भेटले नागराज मंजुळे, पाहा काय म्हणाले होते बीग बी? title=

मुंबई : 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सैराट' (Sairat) हा सिनेमा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात गाजला. या मराठी चित्रपटाच्या यशाने दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule) यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं. नागराज मंजुळे यांचा नवा चित्रपट 'झुंड' (Jhund) आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे.

अमिताभ बच्चन यांची भूमिका

झुंड सिनेमात बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मध्यवर्ती भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीबद्दल नागराज मंजुळे सांगतात की, 'सरांनी 'सैराट' चित्रपट पाहिला असावा, त्यामुळे त्यांनी मला ओळखले होते. ही संकल्पना मी त्यांच्याकडे नेली तेव्हा त्यांना ती आवडली. कदाचित मी एक चांगला चित्रपट करेन असा त्यांना विश्वास होता. ते म्हणाले लिहा, कर. माझ्यासाठी हा चित्रपट अजूनही अविश्वसनीय आहे. संपूर्ण जग बच्चन (Amitabh Bachchan) साहेबांचे चाहते आहे. त्यांना भेटल्यानंतर मी घरी जाऊन घरच्यांशी बोललो तेव्हा त्यांना विचारलं आज काय झालं ते खरं आहे का? मी बच्चन साहेबांना भेटलो, ते प्रत्यक्षात होते की मी स्वप्न पाहत होतो.?

झुंड हा चित्रपट विजय बारसे आणि त्याच्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांची कथा आहे, ज्यांचे आयुष्य त्याने फुटबॉलने सजवले आहे. नागराज मंजुळे सांगतात की, 'या चित्रपटातून मी माझी कथाही सांगत आहे आणि विजय जींची कथाही पडद्यावर घेत आहे. लिहिताना माझ्या लक्षात आले की हा चित्रपट विजय जी आणि त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांची कथा आहे. मग मी 'झुंड' असे चित्रपटाचे शीर्षक ठरवले.'