दोन दिवसातच 'झिम्मा 2'ने गाजवलं बॉक्स ऑफिस; कलेक्शनचा आकडा ऐकून बसेल धक्का

'झिम्मा'प्रमाणेच आता झिम्माचा पुढचा भाग सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे. मराठी प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमा रिलीज होताच प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करताना दिसत आहेत. 

Updated: Nov 26, 2023, 03:24 PM IST
दोन दिवसातच 'झिम्मा 2'ने गाजवलं बॉक्स ऑफिस; कलेक्शनचा आकडा ऐकून बसेल धक्का title=

मुंबई : नुकताच रिलीज झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा 2' हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. २४ नोव्हेंबरला रिलीज झालेला झिम्मा २ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. लॉकडाऊननंतर रिलीज झालेला झिम्मा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. झिम्माप्रमाणेच आता झिम्माचा पुढचा भाग सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे. मराठी प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमा रिलीज होताच प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करताना दिसत आहेत. सगळीकडे या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत. 

इंदूच्या (सुहास जोशी)च्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने परदेशात रियुनियनसाठी निघालेल्या या सात मैत्रिणींचा प्रवास आता थोडा रंजक, थोडा भावनिक आणि थोडा हटके असणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुन्हा झिम्मा' या बहारदार गाण्याची रंगतही आता डबल झाली आहे. अमितराज यांचे संगीत लाभलेल्या या जबरदस्त गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे तर या भन्नाट गाण्याला वैशाली सामंत आणि अपेक्षा दांडेकर यांच्या एनर्जेटिक आवाजाने चारचांद लावले आहेत. 

झिम्मा २ चं बॉक्स ऑफिस कलेक्शन ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
sacnilk च्या अहवालानुसार झिम्मा २ च्या बॉक्स ऑफीस कलेक्शनचा आकडा समोर आलेला आहे. 'झिम्मा 2' या सिनेमाने पहिल्या दिवशी १.२० कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत वाढ झालेली दिसत असून झिम्मा २ ने २.२५ कोटी कमावले आहेत. त्यामुळे झिम्मा २ ने दोन दिवसातच ३ कोटींहून अधिकची कमाई केली आहे. तर लवकरच हा सिनेमा अनेक सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या मार्गावर आहे. याआधी झिम्मा सिनेमाने देखील अनेक रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन केलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या सिनेमात प्रत्येक कलाकाराने सुंदर अभिनय केला आहे. या सिनेमात भली मोठी स्टार कास्ट आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर अशी मोठी स्टारकास्ट आहे. यांच्यावर चित्रित झालेलं मराठी पोरी हे गाणे या सात जणींना या सहलीत पुन्हा एकदा स्वतःची एक वेगळी ओळख करून देत आहे.