मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची फॅशन स्टाइल नेहमीच चर्चेत असते. तिने काहीही परिधान केलं तरी ते ट्रेंडिंग व्हायला वेळ लागत नाही. अलीकडेच जान्हवीने एका अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती जिथे तिने तिच्या हॉट लुकने सर्वांना वेड लावलं होतं. पण काही लोकांना तिचा हा लूक आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. तर काही लोकांनी जान्हवी कपूरच्या प्लास्टिक सर्जरीचा अंदाज लावला आहे.
सोशल मीडियावर उडवली खिल्ली
जान्हवी कपूरने एवॉर्ड फंक्शनमध्ये परिधान केलेल्या ड्रेसमधील तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूप हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. फोटोंमध्ये, जान्हवी डीप नेकलाइन चमकदार बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसतेय. फोटोशूटदरम्यान तिने तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केलीये. न्यूड मेकअप आणि पोनीटेल हेअरस्टाइलमुळे जान्हवी कपूरचा हा लूक अधिक हॉट दिसत आहे. पण आता जान्हवीच्या या लूकची तुलना किम कार्दशियनशी केली जात आहे. कमेंट सेक्शनमध्ये तिची खिल्ली उडवली जात आहे.
जान्हवीच्या फोटोवर युजर्सच्या प्रतिक्रिया
कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहिलं कमेंट करत म्हटलं आहे की, 'गरीबांची किम कार्दशियन'. तर दुसऱ्या एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, 'भारतीय किम कार्दशियन'. तर अजून एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, 'कार्दशियन लाइट' त्याचबरोबर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं आहे की, 'किम कार्दशियनचं भारतीय व्हर्जन'. अशा प्रकारे जान्हवी कपूरला ट्रोल केलं जात आहे.
जाह्नवीने केली प्लास्टिक सर्जरी?
त्याचबरोबर काही युजर्सनी जान्हवी कपूरला प्लास्टिक कपूर म्हटलं आहे. जान्हवी कपूरने प्लॅस्टिक सर्जरी केली आहे, त्यामुळे तिचा लूक पूर्वीपेक्षा खूपच वेगळा दिसत असल्याचा अंदाज लोकांनी लावला आहे. यावर एका यूजरने कमेंट करत 'प्लॅस्टिक सर्जरीवर किती खर्च केला', असं विचारलंय. तर दुसर्याने म्हटलं, 'सर्जरीद्वारे संपूर्ण शरीर आणि चेहरा बदलण्यात आला आहे'.