मुंबई : बॉलीवूडची सगळ्यात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री श्रीदेवी भले या जगातून कायमची निघून गेली आसेल, पण त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत आणि सदैव जिवंत राहतील. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर तिच्या आईच्या खूप जवळ होती. श्रीदेवीही आपल्या दोन्ही मुलींवर अपार प्रेम करायच्या पण मुलगी जान्हवीचा पहिला चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
जान्हवीला येतेय तिच्या आईची आठवण...
श्रीदेवी या जगात आपल्यात नाहीत. पण ही अभिनेत्री आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या आठवणीत सदैव जिवंत असेल. श्रीदेवीची लाडकी मुलगी जान्हवी कपूरला अनेकदा आईची आठवण येते. मदर्स डेच्या खास प्रसंगी जान्हवीने तिच्या आईची आठवण करून तिच्यासाठी एक मेसेजही लिहिला.
जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या आईसोबतचा तिचा बालपणीचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. जान्हवीने फोटोसोबत एक खास नोट लिहिली आहे. जान्हवीने लिहिलं, तुझ्या अनुपस्थितीतही मला तुझं प्रेम दररोज जाणवतं. तुझ्या अनुपस्थितीतही तू जगातील सर्वोत्तम आई आहेस. तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे. यासोबतच जान्हवीने हार्ट इमोजीही शेअर केले आहेत.
जान्हवीचा आईसाठीचा भावनिक संदेश सर्वांच्या हृदयाला भिडणारा आहे. सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सगळेच जान्हवीला भरभरून प्रेम देत आहेत. जान्हवीचं श्रीदेवी यांच्या वरील प्रेम आणि पोस्टने चाहत्यांनाही भावूक केलं आहे. प्रत्येकजण ओल्या डोळ्यांनी अभिनेत्रीची आठवण करतो. पांढरा फ्रॉक घातलेली जान्हवी आईच्या मांडीवर... असलेली जान्हवी एखाद्या बाहुलीपेक्षा कमी दिसत नाहीये. जान्हवीचा श्रीदेवीसोबतचा हा न पाहिलेला फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जान्हवीची पोस्ट पाहून आम्ही हेच म्हणू... की जी माणसं ह्रदयात राहतात, ती नेहमीच तुमच्या हृदयात एक सुंदर आठवण म्हणून राहतात.